SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!

जाहिरात

 

प्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!

schedule23 Sep 26 person by visibility 159 categoryराज्य

◼️प्रवासादरम्यान जादा अथवा मनमानी भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे आवाहन

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून 13 ते 20 सप्टेंबर या कालावधीत 237 बसेसची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी जादा भाडे आकारणीची 8 प्रकरणे निदर्शनास आली असून संबंधितांविरुद्ध प्रतिवेदन/आवश्यक कार्यवाही करण्यात आली. प्रवाशांनी प्रवासादरम्यान जादा अथवा मनमानी भाडे आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित बसचे तिकीट, वाहन क्रमांक, प्रवासाचा तपशील व आकारलेले भाडे याबाबतची माहिती, तक्रारी कार्यालयाचा व्हॉट्सअॅप क्रमांक 9423012134 तसेच e-mail- rto.09-mh@mah.gov.in वर नोंदवाव्यात, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे.

13 ते 20 सप्टेंबर या कालावधीत एकूण 237 बसेस तपासण्यात आल्या. यापैकी 66 वाहने दोषी आढळली तर 8 वाहने जादा भाडे प्रकरणी आढळून आल्या. 237 वाहनांना जादा भाडे न आकारण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच वायुवेग पथकांमध्ये कार्यरत मोटार वाहन निरिक्षक व सहा. मोटार वाहन निरिक्षक यांनी किणी टोल नाका येथे खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबविली. या तपासणी मोहिमेमध्ये 190 बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये 57 वाहने दोषी आढळली तर 2 वाहने जादा भाडे आकारल्याप्रकरणी आढळून आली. यासबंधी 190 वाहनांना जादा भाडे न आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रवाशांकडून शासनाने निश्चित केलेल्या कमाल भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनांविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes