SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चित्रनगरीत विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘सेट’मागचे जगहादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरलीशिरूर हादरले! महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ७४ वर्षीय वृद्ध महिलेचा जीव गेला; रोहिदास नगरात संतापाची लाटगोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार कोल्हापूर जिल्ह्यात अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था; ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात!प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!

जाहिरात

 

गोकुळ निवडणूक: अर्जांच्या छाननीत दिग्गजांना दणका; अर्ज अपात्र ठरले तरी काहींना दिलासा, अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट होणार

schedule23 Sep 26 person by visibility 214 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या २५ जागांसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यामध्ये अनेक बड्या नेत्यांच्या अर्जांना कात्री लागली आहे. माजी संचालक एस.आर. पाटील, मुरलीधर जाधव, रघुनाथ पाटील, युवराज गवळी आणि रामचंद्र डांगे यांच्यासह सर्वसाधारण गटातील १८ अर्ज अपात्र ठरले मात्र अनेकांचे दुसरे अर्ज पात्र ठरल्याने त्यांना दिलासा मिळाला.

◼️छाननीतील ठळक मुद्दे:
 * एकूण अर्ज: २५ जागांसाठी ३०१ उमेदवारांनी ४३६ अर्ज दाखल केले होते.
 * अपात्र अर्ज: छाननी प्रक्रियेत सर्वसाधारण गटातून १८, ओबीसी व महिला गटातून प्रत्येकी १५, तर एससी आणि एनटी प्रवर्गातून प्रत्येकी ५ अर्ज अपात्र ठरले आहेत.

 * कारण काय? सूचक आणि अनुमोदक असलेल्या दूध संस्थांचे पशुखाद्य खरेदी व दूध पुरवठ्याचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे हे अर्ज अपात्र ठरले होते.

दुसऱ्या अर्जामुळे काहींना दिलासा:
अनेकांनी दुसऱ्या गटातून किंवा एकाच गटात दोन अर्ज भरले होते. नियम व निकष पूर्ण करत असल्यामुळे अनेकांचे दुसरे अर्ज पात्र ठरले असून, एका गटात अर्ज अपात्र ठरला तरी दुसऱ्या अर्जामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्यासमोर ही छाननी प्रक्रिया पार पडली. 

गोकुळच्या या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेचा अंतिम व अधिकृत चित्र गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार असून या घडामोडींमुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes