SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात भूदान चळवळीचे प्रणेते: भारतरत्न आचार्य विनोबा भावेकोल्हापूर : गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाईफिटनेससोबत आरोग्य आणि मनोरंजनाचा संगम; रग्डियन ठरतंय कोल्हापुरकरांचं फिटनेस डेस्टिनेशन!माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकरकोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यातकोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफीसण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या

जाहिरात

 

सण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या

schedule10 Sep 26 person by visibility 153 categoryसामाजिक

  कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे किमान 7 दिवस अगोदर तपासणी दिनांकास दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2026 साठी दोन स्वतंत्र संनियंत्रण समितींची नियुक्ती केली आहे.

  कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरसाठी- मोसमी चौगुले, उपविभागीय अधिकारी करवीर उपविभाग, कोल्हापूर यांची अध्यक्ष तर किरण धनवडे, उपायुक्त, कोल्हापूर महानगरपालिका व प्रिया पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर शहर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  ▪️इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजीसाठी
  -दिपक शिंदे, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांची अध्यक्ष तर अशोक कुंभार, उपायुक्त, इचलकरंजी सदस्य महानगरपालिका, इचलकरंजी व विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  संबंधित अधिकारी रजा/बदली/कार्यभार बदल अथवा अन्य कारणांमुळे अनुपस्थित असल्यास, त्यांचा कार्यभार ज्या अधिकाऱ्यांचेकडे सोपविण्यात येईल, त्या अधिकाऱ्यांनी या आदेशानुसार कामकाज पार पाडावयाचे आहे.

  नियुक्त संनियंत्रण समित्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल त्याचदिवशी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित आयुक्तांकडे विनाविलंब सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes