SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात भूदान चळवळीचे प्रणेते: भारतरत्न आचार्य विनोबा भावेकोल्हापूर : गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाईफिटनेससोबत आरोग्य आणि मनोरंजनाचा संगम; रग्डियन ठरतंय कोल्हापुरकरांचं फिटनेस डेस्टिनेशन!माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकरकोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यातकोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफीसण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या

जाहिरात

 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सील

schedule10 Sep 26 person by visibility 205 categoryमहानगरपालिका

▪️महापालिकेच्या इस्टेट विभागाकडून 22 लाखांची वसुली

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभाग व उपद्रव शोध पथकाने छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये धडक कारवाई करत महापालिकेचे भाडे थकीत असलेले तब्बल 13 गाळे सील केले. या कारवाईदरम्यान काही गाळेधारकांनी जागेवरच थकीत रकमेचा भरणा केल्याने महापालिकेच्या तिजोरीत 22 लाख 22 हजार 368/- रुपयांची वसुली झाली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार आज ही कारवाई करण्यात आली.

  महापालिकेच्या शहरातील विविध गाळ्यांच्या भाड्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. सन 2019 ते 2026 या कालावधीतील थकबाकी भरण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी गाळेधारकांना सवलत योजना राबविण्यात आल्या होत्या. तसेच गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही काही गाळेधारकांकडून थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. या मार्केटमधील एकूण थकबाकी सुमारे 1 कोटी रुपये आहे. कारवाई पूर्वी संबंधित गाळेधारकांना थकीत भाडे भरण्याबाबत कार्यालयामार्फत नोटिसा व सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, थकबाकी न भरल्याने अखेर 13 गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली. या कारवाईत किराणा, इलेक्ट्रीक, लॉटरी व चप्पल लाईनच्या गाळ्यांचा समावेश आहे. 

दरम्यान, उर्वरित काही गाळेधारकांनीही आज तातडीने थकीत रकमेपैकी काही रक्कम महापालिकेकडे जमा केली. उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राम काटकर, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे तसेच इस्टेट विभागातील कर्मचाऱ्यांनी व उपद्रव शोध पथकातील जवानांनी ही कारवाई केली.

    महापालिकेच्या गाळ्यांमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या सर्व गाळेधारकांनी आपली थकबाकी तात्काळ भरावी अन्यथा थकबाकीदार गाळ्यांवरही सील बंदची कारवाई करण्यात येईल असा इशारा इस्टेट विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes