SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात भूदान चळवळीचे प्रणेते: भारतरत्न आचार्य विनोबा भावेकोल्हापूर : गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाईफिटनेससोबत आरोग्य आणि मनोरंजनाचा संगम; रग्डियन ठरतंय कोल्हापुरकरांचं फिटनेस डेस्टिनेशन!माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकरकोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यातकोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफीसण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या

जाहिरात

 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफी

schedule10 Sep 26 person by visibility 190 categoryराज्य

कोल्हापूर : आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसना पथकरातून (टोल) सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ८ सप्टेंबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार ही टोलमाफी ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (NH-48), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66), सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीतील कोकणाकडे जाणारे रस्ते तसेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’ या मार्गांवर ही सवलत लागू राहणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहने आणि एसटी महामंडळाच्या बसेस या टोलमाफीस पात्र असतील.

टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ या आशयाचे स्टिकर स्वरूपातील पास लावणे आवश्यक आहे. या पासवर वाहन क्रमांक, मालकाचे अथवा चालकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आणि प्रवासाचा मार्ग नमूद केला जाणार आहे. हा पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे.

गणेशभक्तांना हे पास प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस चौक्या आणि पोलीस ठाण्यांमध्ये समन्वयाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes