SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री इंजिनिअरिंग, शॉर्ट टर्म कोर्सेस चा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात भूदान चळवळीचे प्रणेते: भारतरत्न आचार्य विनोबा भावेकोल्हापूर : गोखले कॉलेज ते मंगेशकर नगर परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाईफिटनेससोबत आरोग्य आणि मनोरंजनाचा संगम; रग्डियन ठरतंय कोल्हापुरकरांचं फिटनेस डेस्टिनेशन!माधुरी हत्ती गुजरातमधून नांदणीकडे रवाना : आमदार यड्रावकरकोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यातकोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केटमधील थकबाकी असलेले 13 गाळे सीलकोल्हापूर : प्रभाग क्र. ४ मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची अचानक तपासणी, २० कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना ११ ते २७ सप्टेंबरदरम्यान टोलमाफीसण-उत्सवांतील मंडप तपासणीसाठी दोन संनियंत्रण समित्या

जाहिरात

 

कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत अवैध मावा कारखान्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांचा छापा; २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात

schedule10 Sep 26 person by visibility 265 categoryगुन्हे

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी क्राईम आढावा बैठकीमध्ये सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  श्रीराम कन्हेरकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे एक विशेष पथक तयार करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

याच पार्श्वभूमीवर, आज दिनांक १०.०९.२०२६ रोजी दुपारी १५.१० वाजेच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार मंगेश माने (पोकॉ/१५७३) यांना गोपनीय बातमीदाराकडून विश्वसनीय माहिती मिळाली की, लक्षतीर्थ वसाहत येथील शिवनेरी गल्लीतील एका घरात बऱ्याच दिवसांपासून विनापरवाना व अवैध मावा तयार करण्याचा कारखाना सुरू आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम आणि पोलीस पथकाने तात्काळ लक्षतीर्थ वसाहतीमधील सदर घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी फारुक हसन म्हालदार हा त्याच्या घरातील इलेक्ट्रीक मावा मळणी मशीनच्या सहाय्याने सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू व इतर पदार्थांचे मिश्रण करून मावा तयार करत असल्याचे निदर्शनास आले.

◼️कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:
 * कारवाईचे ठिकाण: राहते घर, नं. २४५, ए-वॉर्ड, शिवनेरी गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर.
 * ताब्यात घेतलेला आरोपी: फारुक हसन म्हालदार, वय ४६ वर्षे.
 * जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: इलेक्ट्रीक मावा मळणी मशीन, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी बारीक सुपारी भरलेली ८ प्लॅस्टिक पोती (किंमत रु. ५१,८००/-) तसेच इतर सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखू असा एकूण रु. २,५०,६५०/- किंमतीचा मुद्देमाल.
 * नोंदविण्यात आलेला गुन्हा: लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  आप्पासाहेब पवार आणि उपविभागीय अधिकारी (शहर विभाग) श्रीम. प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम कन्हेरकर, पोसई संतोष कदम, आणि पोलीस अंमलदार मंगेश माने, तानाजी दावणे, गजानन परीट, प्रितम मिठारी, सागर डोंगरे, किशोर पवार, अतुल पाटील यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes