कोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंद
schedule06 Oct 26 person by visibility 200 categoryगुन्हे
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या 'नशामुक्त कोल्हापूर' मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) शाहूपुरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. जयंती नाला परिसरात एम.डी. (Mephedrone) ड्रग्सची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी रंगेहात पकडले.
पोलिसांनी संशयित सॅम्युअल दिपक पवार (वय २२) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय २४, दोन्ही रा. शाहूपुरी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २० ग्रॅम एम.डी. ड्रग्स, मोबाईल आणि एक अॅक्टिव्हा गाडी असा एकूण २,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.