SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मतदानाच्या 48 तास आधी प्रचारबंदीकोल्हापूर : अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्पला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणीतमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणीगोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि 'बजाज स्टेप'च्या पहिल्या तुकडीचा दिमाखदार पदवीदान समारंभ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंकाचाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

जाहिरात

 

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारबंदी

schedule06 Oct 26 person by visibility 138 categoryराजकीय

🔵 21 ऑक्टोबर रात्री 10 पासून आदेश लागू; सभा, बैठका व पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास मनाई

कोल्हापूर : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2026 साठी शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या 48 तास आधी, म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 23 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत निवडणूक प्रचार, सार्वजनिक सभा, बैठका तसेच बेकायदेशीर जमाव जमविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163 अन्वये पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात हा आदेश लागू केला आहे.
या कालावधीत सार्वजनिक सभा, बैठका घेणे, निवडणूक प्रचार करणे तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई राहणार आहे. मात्र, पूर्वनियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, तसेच राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी आणि निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

🟢 पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदान केंद्र परिसरात निर्बंध लागू
 पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून 23 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततामय, निर्भय व सुरळीत वातावरणात पार पडावी तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 अन्वये कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित मतदारसंघाच्या हद्दीत मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विविध निर्बंध लागू केले आहेत.

मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मतदान केंद्राच्या परिसरामध्ये खालील कृती करण्यास मनाई केली आहे.-

निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी 6 वाजण्यापूर्वी व रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पुर्ण होण्याच्या वेळेपासून 48 तास अगोदर लाऊड स्पिकरचा वापर करता येणार नाही.

कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणाच्या जवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था इ. सारख्या सार्वजनिक ठिकाणाच्या जवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही. पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतदानादिवशी मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासुन 200 मीटरच्या परिसरात कोणाही व्यक्तिला कोणत्याही स्वरुपात निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकविणे, मतदारावर ठराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे, मतदाराचा मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे, उमेदवाराचे चिन्ह दर्शविणारे नोटीस बोर्ड प्रदर्शित करणे, मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करणे तसेच मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करणे (निवडणुकीचे कामकाजात नेमलेले शासकीय अधिकारी/कर्मचारी वगळून.) अशी कृत्ये करता येणार नाहीत.

राज्याची अगर देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अगर आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करता येत नाही. पदवीधर व शिक्षक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने लोकप्रतिनिधित्य अधिनियम 1951 चे कलम 127 (अ) मधील तरतुदीचा भंग होईल अशाप्रकारे कोणत्याही निवडणूक प्रचाराविषयक साहित्याची छपाई करता येणार नाही.

शस्त्र अधिनियम 1959 व शस्त्र नियम 1962 च्या तरतुदीखाली विशिष्ट परिस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या पूर्वपरवानगीने (खासगी सुरक्षा वगळून) नॅशनलाईज्ड बँका, सहकारी तत्वावरील बँका, महत्वाची धार्मिक स्थळे, रायफल क्लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगिक युनिट, पब्लिक एंटरप्राईजेस यांना अशी हत्यारे (व दारुगोळा) वाहतुक करता येईल. तथापि हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना (पोलीस अधिकारी व अंमलदार) लागू राहणार नाही.

पदवीधर व शिक्षक निवडणूक 2026 च्या कालावधीत मोटारगाड्या, वाहने ही कोणत्याही परिस्थितीत तीन पेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात चालविण्यात येवू नयेत. मात्र हा आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाड्यांच्या ताफ्यात तो केंद्र किंवा राज्य शासनाने किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तिस घेवून जात असेल आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना झेडप्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षितते विषयी वापरल्या जाणा-या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही.

निवडणूक विषयक प्रचाराच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 मधील तरतुदींचा भंग होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करता येणार नाही. पदवीधर व शिक्षक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतदार म्हणून नोंद नसलेल्या/मतदानाचा हक्क बजाविण्यास पात्र नसलेल्या राजकीय पक्षप्रमुख व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून 48 तासाच्या कालावधीत वास्तव्य करता येणार नाही.

या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes