गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील
schedule06 Oct 26 person by visibility 184 categoryउद्योग
पुणे : गोकुळ निवडणुकीत महायुतीत एकवाक्यता नाही म्हणून बिनविरोधच पिल्लू सोडून चर्चा भरकटण्याचा प्रयत्न करत आहेत तर माझे नातेसंबंध असलेली भाचीला राज्यपाल कोट्यातून आमदार पद का दिले नाही. भाजपचीही खेळी सर्वांना माहित आहे त्यामुळेच पुणे पदवीधर व शिक्षक मतदार साठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीमध्ये एकवाक्यता नसून जागावाटपावरून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी चढाओढ सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना जादा जागा मिळू नयेत, यासाठी खुद्द महायुतीतूनच प्रयत्न केले जात आहेत. याच राजकीय समीकरणांमधून बिनविरोध निवडणुकीची चर्चा किंवा 'पिल्लू' सोडण्यात आले आहे; मात्र गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. तर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी, ७ ऑक्टोबर अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, त्याचा आपण पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. "राजकारण वेगळे आणि नातेसंबंध वेगळे असतात असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाच्या रणनीतीवर टीका केली.भाजपला जर डॉ. ग. गो. जाधव व पी. डी. पाटील यांच्या विषयी इतकेच प्रेम होते, तर त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून डॉ. स्मिता जाधव यांना आमदार का केले नाही? भाजपचा राजकीय डाव नेमका काय आहे, हे जनता आणि सर्वांना चांगले ठाऊक आहे. आम्ही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणू असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.