SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मतदानाच्या 48 तास आधी प्रचारबंदीकोल्हापूर : अधिकृत फेरीवाल्यांसाठी विशेष कॅम्पला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादकोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणीतमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणीगोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि 'बजाज स्टेप'च्या पहिल्या तुकडीचा दिमाखदार पदवीदान समारंभ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंकाचाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

जाहिरात

 

कोल्हापूर : 'या' प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैद्यकीय पात्रता आणि फिटनेस प्रमाणपत्राबाबत गंभीर शंका; चौकशीची मागणी

schedule06 Oct 26 person by visibility 154 categoryसामाजिक

कोल्हापूर  : कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (CPR) कार्यरत प्रशासकीय अधिकारी  मानसिंग जगताप यांच्या रंगअंधत्वाबाबतच्या (Colour Blindness) वैद्यकीय नोंदी आणि त्यांना मिळालेल्या फिटनेस व दिव्यांग प्रमाणपत्रात मोठी विसंगती असल्याचे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ते धनाजी हरी पाटील यांनी याप्रकरणी गंभीर आक्षेप घेत या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे.

माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार,  जगताप यांनी स्वतः रंगअंध असल्याचे मान्य केले होते, मात्र ससून रुग्णालयाच्या बोर्ड ऑफ रेफरलच्या प्रक्रियेनंतर त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले. यासंदर्भातील माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असून, नियमबाह्य पद्धतीने हे प्रमाणपत्र मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत  जगताप यांना त्यांच्या प्रशासकीय पदावरून निलंबित करण्यात यावे, अशी मुख्य मागणी पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes