SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजेंद्रनगर घरफोडीचा गुन्हा उघड; १०२ ग्रॅम सोने व १६ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्तकोल्हापुरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई; ४३२ चालकांकडून ३,८०,८५० रुपयांचा दंड वसूलरंकाळा परिसरातील रस्त्यांवरील अडथळे हटविण्यासाठी धडक कारवाई; 250 हून अधिक हातगाड्या हटविल्याथकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर महापालिकेची कारवाईकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीकडे पाठवावा : पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटीललोकभवन येथे राज्यपालांकडून सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादनजलसंधारण दिनानिमित्त उद्या 21 ऑगस्टला ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’प्लास्टिक वापरावर कोल्हापूर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगरातील 3 व्यापाऱ्यांवर 15 हजारांचा दंड ; 230 किलो प्लास्टिकचा साठा जप्त"दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६" उत्साहात संपन्न; फाईट क्लब संघाला प्रथम पारितोषिककोल्हापूर : थकीत घरफाळ्यामुळे IIB कोचिंग क्लासेसला सील

जाहिरात

 

लोकभवन येथे राज्यपालांकडून सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

schedule20 Aug 26 person by visibility 84 categoryराज्य

मुंबई : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी लोकभवन येथे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व उपस्थित पोलीस अधिकारी व जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.

   "जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची" प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes