गोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार
schedule22 Oct 26 person by visibility 285 categoryसामाजिक
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या नूतन संचालक मंडळाचा आणि समविचारी आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने नुकताच अत्यंत उत्साहात सत्कार करण्यात आला.
शांतदेवी डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि तेजस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला.
या सोहळ्यात समविचारी आघाडीच्या सर्व संचालकांचे पाटील कुटुंबीयांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, स्नेहा तेजस पाटील आणि देवश्री सतेज पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांना औक्षण करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्यात गोकुळचे संचालक शशिकांत आनंदराव पाटील (चुयेकर), शशिकांत खोत, राजू बाबा आवळे, अभिजित प्रभाकर तायशेटे, प्रा. किसन बापूसाो चौगले, बाबासाहेब श्रीपती चौगले, राहुल बजरंग देसाई, विद्याधर बाबुराव गुरबे, बाबासाहेब देवकर, बयाजी शेळके, विश्वजीत जाधव, अंजना केदारी रेडेकर आणि भाग्यश्री धीरज डोंगळे या सर्व संचालकांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व संचालकांनी अभिवादन केले.