SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरुकनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील ७ आस्थापने सीलहॉटेल्स, हॉस्पिटल्स व व्यापारी संकुलांच्या बांधकामांची कोल्हापूर महापालिकेकडून होणार तपासणीटीकेआयईटीमध्ये 'वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब'चे दिमाखदार उद्घाटनफुलेवाडीत ३० ऑक्टोबरपासून भव्य ‘फुलेवाडी महोत्सव’; विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजनगोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार८३ व्या वर्षीही अखंड भाषासेवा!पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

जाहिरात

 

कनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणी

schedule22 Oct 26 person by visibility 169 categoryआरोग्य

◼️आजअखेर आरोग्य अभियानातील लाभार्थ्यांची संख्या ९ हजार ७८७ वर

शिरोळ : सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिरोळ तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत कनवाड आणि कुटवाड येथे आयोजित शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन्ही गावांतील शिबिरांमध्ये एकूण ५७७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कनवाड येथे २५०, तर कुटवाड येथे ३२७ नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला. या शिबिरांमुळे अभियानातील आजअखेरच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या ९ हजार ७८७ वर पोहोचली आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, विविध आजारांचे वेळेत निदान करणे आणि आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या या अभियानाला शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावागावांत शिबिरांचे आयोजन केल्यामुळे नागरिकांना आपल्या गावातच आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींचे वेळीच निदान करण्यास मदत होत असून, नागरिकांना मोफत तपासणीचा लाभ मिळत आहे.

कनवाड येथील शिबिरात इरफान बुरान, सुरेश नाईक, बबन शिंदे, अझरुद्दीन पट्टेकरी, मुसाअली इनामदार, सुनील बिरनाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कुटवाड येथील शिबिरात प्रकाश कांबळे, आनंदराव पाटील, श्रीकांत पाटील, फतेसिंह पाटील, अमोल पाटील, प्रकाश चव्हाण, अमरसिंह पाटील, उमेश खराडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes