SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंहकोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक औषध भांडारात औषधांचा साठा नियमानुसार उपलब्‍ध असून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा सुरळीत सुरुकनवाड व कुटवाड येथील आरोग्य शिबिरात ५७७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर : विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील ७ आस्थापने सीलहॉटेल्स, हॉस्पिटल्स व व्यापारी संकुलांच्या बांधकामांची कोल्हापूर महापालिकेकडून होणार तपासणीटीकेआयईटीमध्ये 'वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब'चे दिमाखदार उद्घाटनफुलेवाडीत ३० ऑक्टोबरपासून भव्य ‘फुलेवाडी महोत्सव’; विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजनगोकुळच्या नूतन संचालक मंडळाचा पाटील कुटुंबीयांच्या वतीने सत्कार८३ व्या वर्षीही अखंड भाषासेवा!पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

जाहिरात

 

कोल्हापूर : विनापरवाना व्यवसाय व घरफाळा थकबाकीप्रकरणी वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील ७ आस्थापने सील

schedule22 Oct 26 person by visibility 160 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणे तसेच भाडेकरारानुसार घरफाळ्याची करआकारणी न केल्याप्रकरणी रंकाळा रोडवरील वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील सात आस्थापनांवर महानगरपालिकेच्या परवाना विभाग व विभागीय कार्यालय क्र.२, छत्रपती शिवाजी मार्केट येथील घरफाळा विभागाच्यावतीने संयुक्त कारवाई करून ती सील करण्यात आली.
या कारवाईदरम्यान बी. एम. एक्स. कापड शोरूमच्या परवान्याबाबत तपासणी सुरू असताना संबंधित दुकानमालकाने दुकान सीलबंद होऊ नये, यासाठी भितीपोटी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दुकानाच्या आत डांबून बाहेरून कुलूप लावून निघून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी महापालिकेच्या पथकाने तत्काळ कारवाई करून दुकानातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. त्यानंतर संबंधित दुकान सीलबंद करण्यात आले.

या कारवाईदरम्यान वॉटर फ्रंट अपार्टमेंटमधील पीटर इंग्लंड कपडे शोरूम, दीपक साडी सेंटर, टेबल ड्रायल लाँड्री, बी. एम. एक्स. कापड दुकान, महालक्ष्मी एक्सक्लुझिव्ह, वेस्टर युनिक आणि लॉरीआय लाँड्री प्रोफेशनल या सात आस्थापनांमध्ये व्यवसाय परवाना नसल्याचे निदर्शनास आले. तसेच भाडेकरारानुसार करआकारणी करण्यात आली नसल्याने संबंधित आस्थापनांवर सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली.

आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे व सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील विनापरवाना व्यावसायिक आस्थापनांना नवीन व्यवसाय परवाना घेण्यासाठी तसेच आवश्यक भाडेकरार सादर करण्यासाठी यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित आस्थापनांनी नोटिसांनंतरही आवश्यक कार्यवाही केली नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील घरफाळा थकबाकीदार मिळकतधारक तसेच विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. यापुढेही विनापरवाना व्यवसाय आणि घरफाळा थकबाकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आवश्यक व्यवसाय परवाना घेऊन तसेच घरफाळ्याची थकीत रक्कम तातडीने भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कारवाईत परवाना अधीक्षक अशोक यादव, परवाना निरीक्षक उदय भोसले, वरिष्ठ कर सहायक सोहेल शेख, सचिन इंगवले, उपद्रव शोध पथकाचे अशोक साठे, विनोद रुईकर, युवराज पोवार, भोलानाथ पाटणकर तसेच घरफाळा विभाग व विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes