SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीमुदाळ तिट्टा येथे बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिला अटकेत; २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जप्तराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कोल्हापूर दौरापार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकरउपद्रव शोध पथकाची धडक कारवाई सुरूच ठेवण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशरस्त्यावरील गणेश मंडप तातडीने काढण्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे आवाहनमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करा; कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पारंपरिक झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५जागतिक रेबीज दिन: कारणे, परिणाम आणि जनजागृती

जाहिरात

 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पारंपरिक झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात

schedule28 Sep 26 person by visibility 282 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये गौरी-गणपती उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक 'झिम्मा-फुगडी' स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली. लोप पावत चाललेल्या पारंपरिक लोकसंस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि खेळांमधून आरोग्य संवर्धन व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी विद्यार्थिनींनी नऊवारी साडी आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून साधी फुगडी, चुई फुई , घोडा, घागर नाचविणे, सूप नाचविणे, काटवट कणा,चौफुला, झिम्मा यांसारखे विविध खेळ सादर केले. टाळ्यांचा गजर आणि पारंपरिक लोकगीतांनी संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला होता. आधुनिक युगातही आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना इंनेरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज व वणकुद्रे किचन वेअर्स यांच्या वतीने स्टील वॉटर बॉटल व पर्स अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 कार्यक्रमास इंनेरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज च्या प्रेसिडेंट  वृषाली बाड, खजाननिस राधिका कुमठेकर, राधिका पाटील व वणकुद्रे किचन वेअर्स च्या मधुरा वणकुद्रे मुख्याध्यापिका  सविता पाटील, उपमुख्याध्यापक  बी एस चोपदार, पर्यवेक्षिका  अंजली अंबार्डेकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes