राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कोल्हापूर दौरा
schedule28 Sep 26 person by visibility 150 categoryराज्य
कोल्हापूर : राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.10 वाजता हॉटेल सयाजीकडे प्रयाण. सकाळी 10.25 वाजता हॉटेल सयाजी येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 ते 11.15 वाजता 'फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन' (FIEO) आणि 'महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ' (MSSIDC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'रिझर्व्ह बायर-सेलर मीट' (Reserve Buyer-Seller Meet) मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. सकाळी 11.15 ते 11.30 वाजता राखीव.
सकाळी 11.30 वाजता महालक्ष्मी / अंबाबाई मंदिराकडे प्रयाण. 11.45 वाजता महालक्ष्मी/अंबाबाई मंदिर येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. दुपारी 12.15 ते 1 वाजता जिल्हा दंडाधिकारी/ आयुक्त यांच्याद्वारे सादरीकरण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. 1.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1.05 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30 ते 3 वाजता प्रमुख व्यक्तींशी भेट. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 3.20 वाजता मुंबईकडे प्रयाण.