SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कामगार क्रीडा भवनातील खेळाडू सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीमुदाळ तिट्टा येथे बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिला अटकेत; २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जप्तराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा कोल्हापूर दौरापार्वती इंडस्ट्रियल इस्टेटमुळे परिसराच्या अर्थचक्राला मोठी चालना : आमदार यड्रावकरउपद्रव शोध पथकाची धडक कारवाई सुरूच ठेवण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांचे निर्देशरस्त्यावरील गणेश मंडप तातडीने काढण्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे आवाहनमुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून अटक करा; कोल्हापुरात काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पारंपरिक झिम्मा-फुगडी स्पर्धा उत्साहात प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५जागतिक रेबीज दिन: कारणे, परिणाम आणि जनजागृती

जाहिरात

 

मुदाळ तिट्टा येथे बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी महिला अटकेत; २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जप्त

schedule28 Sep 26 person by visibility 172 categoryगुन्हे

कोल्हापूर  : मुदाळ तिट्टा (ता. कागल) येथील बस स्टँडसमोरील परिसरात दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी एस टी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे डोरले (मणी मंगळसूत्र) चोरीला गेले होते. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे समांतर तपास केला.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी रेकॉर्डवरील महिला आरोपी भिवरा पंडित लोंढे (वय ५०, रा. इस्पूर्ली, ता. करवीर) हिस ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली. तिने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून १,५२,००० रुपये किमतीचे २१.१८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले यशस्वीरित्या जप्त केले आहेत. सदर महिला आरोपी व जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुरगुड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes