SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सवकोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन: काळाची गरजपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणीनदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा : भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव १ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईयंदा शिवसेनेची “विकासाची भगवी दहीहंडी” : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर; विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

जाहिरात

 

यंदा शिवसेनेची “विकासाची भगवी दहीहंडी” : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर

schedule03 Sep 26 person by visibility 184 categoryराजकीय

◼️दि.५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रंगणार दहीहंडीचा थरार 

कोल्हापूर  : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यामातुन कोल्हापूरच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने  कोल्हापुरातील विकासकामांसाठी गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यामाध्यमातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांनी शहरात विकासकामांचे अनेक नवे थर रचले जात आहेत आणि या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा आलेख उंचावला आहे. यामध्ये प्रामुख्याने पूर नियंत्रण प्रकल्प, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रस्ते, रंकाळा सुशोभिकरण, गांधी मैदानाचे काम, केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण या प्रमुख विकासकामांसह सर्किट बेंच, आय.टी.पार्क, महापालिकेतील रोजंदारी कर्मचारी कायम करणे अशा कामांमुळे कोल्हापूर नव्या रुपात परिवर्तीत होताना दिसत आहे.

आगामी काळातही असेच कोल्हापूरच्या विकासाचे थर रचण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, यंदा शिवसेनेच्या वतीने “विकासाच्या भगव्या दहीहंडी” चा दि.०५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर येथे थरार रंगणार असल्याची माहिती युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव व नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

या पुढे म्हंटले आहे कि, महायुतीच्या हिंदुत्ववादी सरकारने सर्व हिंदू उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्यदिव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शिवसेनेच्या "विकासाची भगवी दहीहंडी" चे आयोजन करण्यात आले आहे.

गेली १९ वर्षे अखंडितपणे "भगवी" दहीहंडीचे आयोजन करण्यात येते आहे. यावर्षी दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला रु.१ लाख ११ हजार १११ इतके बक्षीस देण्यात येणार असून, इतर आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तरी या दहीहंडी स्पर्धेत जास्तीत जास्त गोंविंदा पथकांनी सहभाग घ्यावा आणि कोल्हापूर वासियांनी या दहीहंडीचा थरार पाहण्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहनही नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes