SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सवकोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन: काळाची गरजपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणीनदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा : भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव १ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईयंदा शिवसेनेची “विकासाची भगवी दहीहंडी” : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर; विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

जाहिरात

 

कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई

schedule03 Sep 26 person by visibility 218 categoryराज्य

◼️थकबाकीपोटी रू.1 लाख 23 हजार 141 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी करण्यात येत आहे.

 याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील विक्रम नगर परिसरात मोठे थकबाकीदार नळ कनेक्शनधारक यांच्यावर कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 10 थकबाकी धारकांची कनेक्शन तोडण्यात येऊन थकबाकीपोटी रू.1 लाख 23 हजार 141 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आली आहे.

  सदरची कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने, अतिरीक्त आयुक्त शिल्पा दरेकर व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 या कारवाईमध्ये शाखा अभियंता सुनिल भाईक, मीटर रीडर गणेश देसाई, पथक कर्मचारी अरूण प्रभावळे, बाबासाहेब पठाण, भूपाल कुंभार, संजय चौगुले, प्रवीण वरेकर, मुकुंद माने, प्रितेश रणवरे, महावीर आवळे व फिटर संभाजी रूईकर यांनी प्रमुख सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes