SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सवकोल्हापुरात शुक्रवारी, शनिवारी दिनमान साहित्य उत्सवाचे आयोजन राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन: काळाची गरजपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणीनदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा : भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव १ कोटींहून अधिक किमतीचे ४०० हरवलेले मोबाईल नागरिकांच्या हातात; कोल्हापूर सायबर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!३ वर्ष ९ महिने पोलिसांना गुंगारा देणारा 'ए एस ट्रेडर्स'चा मुख्य एजंट अखेर जेरबंद!कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 10 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईयंदा शिवसेनेची “विकासाची भगवी दहीहंडी” : नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर बदलत्या सामाजिक परिस्थितीतही खांडेकरांचे साहित्य प्रस्तुत: डॉ. भालचंद्र मुणगेकर; विद्यापीठात वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभ

जाहिरात

 

६६७ दूध संस्थांच्या मतदान पात्रतेवर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब; 'गोकुळ'च्या सत्ताधाऱ्यांकडून गडहिंग्लजमध्ये आनंदोत्सव

schedule04 Sep 26 person by visibility 57 categoryउद्योग

गडहिंग्लज : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालामुळे सत्ताधारी गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. अवसायनातील ४९२ आणि कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५, अशा एकूण ६६७ दूध संस्थांच्या मतदानास पात्रतेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'गोकुळ'च्या सत्ताधारी संचालक मंडळ व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सध्या 'गोकुळ'च्या निवडणूक प्रचारािमत्त सत्ताधारी गटाचा दौरा गडहिंग्लज तालुक्यात सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत सत्ताधाऱ्यांनी जोरदार आनंद व्यक्त केला.


या आनंदोत्सवात व प्रचार दौऱ्यात प्रामुख्याने खालील पदाधिकारी व नेते उपस्थित होते. माजी अध्यक्ष: विश्वास नारायण पाटील (आबाजी), नविद मुश्रीफ, संचालक मंडळ: युवराज पाटील (बापू), अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील,  सतीश पाटील-गिजवणेकर (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), राहुल शिरकोळी, विजय दाभाडे, शिवराज पाटील.

या न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीच्या रिंगणातील सत्ताधारी गटाचे पारडे अधिक जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, विरोधकांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes