SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार गुणस्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मानमहाराष्ट्र दिन : मराठी अस्मितेचा सुवर्ण सोहळास्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

जाहिरात

 

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

schedule30 Apr 26 person by visibility 399 categoryसामाजिक

◼️गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते कला अकादमी येथे होणार उद्घाटन

कोल्हापूर  :  देशातील सर्वात मोठी डिजिटल मीडियातील संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाधिवेशन पणजी गोवा येथील कला अकादमी येथे दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी १०  ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न होणार आहे.

 या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक, स्वागताध्यक्ष गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, उद्योग मंत्री उदय सामंत, गोवा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री रमेश तवडकर,  कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे,अध्यक्ष आयुष्यभान भारत योजना महाराष्ट्र  ओमप्रकाश शेटे , गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर,खासदार सदानंद शेठ तानावडे, चंदगड चे आमदार शिवाजी पाटील, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ  यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष राजा माने व संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत व राज्य सचिव विकास भोसले  यांनी दिली.

   या पत्रकार परिषदेला संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, महेश कुगावकर, राष्ट्रीय महासचिव तेजस राऊत,राज्य उपाध्यक्ष संजय भैरे,मुंबई विभाग अध्यक्ष शशिकांत देशमुख,राज्य संघटक मयूर गलांडे यांची उपस्थिती होती.

 डिजिटल मीडियाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक, तेलंगाना,आंध्र प्रदेश,पंजाब, दिल्ली या राज्यातून हजारो संपादक पत्रकार उपस्थित राहणार आहेत.

  या महाअधिवेशनात  महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत  संपादक व मध्यम तज्ञ राजा माने हे घेणार असून यावेळी विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी या पुरस्काराची घोषणा राजा माने यांनी केली.

   महा अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असून  ऍड. संदीप कायदे (पंढरपूर )यांचे ’अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संविधानिक स्वरूप’, ऍड.नकुल पार्सेकर (सावंतवाडी) यांचे ’समाजमाध्यमांचा न्यायालयीन प्रक्रियेतील अडथळा’...,सौमित्र देसाई, पूणे यांचे AI चा डिजिटल मीडियातील प्रभावी वापर   या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मीडियातील विविध मागण्यांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे ठराव यावर चर्चा करून अंतिम मसुदा सादर केला जाणार आहे.

  पणजी गोवा येथे होणारे राष्ट्रीय अधिवेशन डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल, या महाधिवेशनाचा फायदा देशभरातील डिजिटल मीडियातील  संपादक पत्रकारांना खूप चांगल्या पद्धतीने होईल  असा विश्वास यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केला.

 ▪️डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय वतीने पुरस्कारांची घोषणा

 ◼️राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६ प्राप्त मान्यवर 

1) श्री. कमलाकांत तारी,(गोवा ) गोवंश

 संवर्धक 

2) डॉ. महुवा शाह,(गोवा )

 शास्त्रज्ञ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी 

3) आमदार निलेश राणे , कुडाळ (विधिमंडळ उत्कृष्ट कार्य )

4)श्री. कमलेश बांदेकर, (गोवा )

योग प्रसारक

5)श्री दीपक नार्वेकर,(गोवा )

 उत्कृष्ट प्रशासन 

6) गुरुप्रसाद पावसकर, (गोवा )

आयुक्त, दिव्यांग संचालनालय

7)  नेहा आंग्रे,गावस, (गोवा )

समाजसेवा 

8) प्रकाश कुलकर्णी,मुंबई ( कृषी )

9)माणिक तुकाराम शेडगे  सातारा ( सामाजिक कार्य )

10)  चित्राताई क्षीरसागर ,गोवा ( कवयित्री व साहित्यिक )

11) निलेश भगवान सांबरे पालघर ( ग्रामसेवा )

12) प्रा. विशाल गरड,बार्शी ( प्रबोधन )

 13) राधा उत्तरेश्वर खताळ, वडवणी बीड( कार्यक्षम सरपंच )

14) गोवर्धन दराडे ,बीड ( अनाथ संगोपन )

15) संतोष ठोंबरे , बार्शी  ( उद्योग)

16)  पद्मज गुप्ता, नागपुर ( गो सेवा )

17) राकेश अग्रवाल , मुंबई ( सामाजिक )

18) राजेंद्र पाठक ,मुंबई ( बाल मदत )

19) विकास देशमुख , मुंबई ( आरोग्य सेवा)

20) ग्रामविकास नागझरी 

( जलसंधारण व ग्रामविकास संस्थात्मक पुरस्कार )

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes