SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार गुणस्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मानमहाराष्ट्र दिन : मराठी अस्मितेचा सुवर्ण सोहळास्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

जाहिरात

 

राष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवड

schedule30 Apr 26 person by visibility 270 categoryउद्योग

इचलकरंजी : साखर उद्योगातील देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित तांत्रिक संस्था असलेल्या 'द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया' (STAI) नवी दिल्लीच्या कौन्सिल सदस्यपदी सन २०२६ ते २०२९ या त्रैवार्षीक कालावधीकरिता  मनोहर गोपाळ जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री. जोशी हे हुपरीतील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.

या निवडीद्वारे मनोहर जोशी हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश असलेल्या 'रिजन ३.३.५' चे प्रतिनिधित्व करणार आहेत. साखर उद्योगातील तांत्रिक आधुनिकीकरण, धोरण निश्चिती आणि संशोधनामध्ये या रिजनचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

१९२५ मध्ये स्थापन झालेली ही साखर उद्योगातील व्यावसायिकांची संस्था आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची मान्यता लाभलेली ही संस्था साखर उत्पादन, अभियांत्रिकी, शेती आणि उप-उत्पादने या विषयांत जागतिक स्तरावर कार्यक्षमपणे कार्य करते.
मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आधुनिकीकरण आणि बगॅस व ऊर्जा बचतीत केलेले प्रयोग पथदर्शक ठरले आहेत. यामुळे जवाहर साखर कारखान्याने तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यांच्या याच तांत्रिक अनुभवाचा लाभ आता देशातील पाच राज्यांतील साखर कारखान्यांना होणार आहे.

असोसिएशनची ८८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पहिली कौन्सिल मीटिंग येत्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी गोवा येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक बैठकीत  जोशी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारतील आणि साखर उद्योगाकरिता आगामी तीन वर्षांचा विकासाचा अजेंडा निश्चित करतील.
'ही निवड म्हणजे महाराष्ट्रातील साखर तंत्रज्ञांनी माझ्यावर टाकलेला मोठा विश्वास आहे. आगामी काळात साखर उद्योगाला अधिक कार्यक्षम बनवणे, बायो-रिफायनरी मॉडेलला गती देणे आणि तांत्रिक क्रांतीद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही माझी प्राथमिकता राहील असे मत श्री. जाशी यांनी निवडीच्या निमित्ताने व्यक्त केले.

या निवडीबद्दल जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ आणि साखर उद्योगातील मान्यवरांकडून जोशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes