SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार गुणस्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणकळंबा ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते ध्वजपूजन, तर प्रकाश खडके यांच्या हस्ते ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात कामगार दिन : श्रमिकांच्या घामाचा आणि संघर्षाचा सन्मानमहाराष्ट्र दिन : मराठी अस्मितेचा सुवर्ण सोहळास्वच्छता मोहिमेत 25 टण प्लास्टिक, तणकट व खरमाती उठावटाकाळा येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून पाहणीराष्ट्रीय साखर तंत्रज्ञ असोसिएशनच्या कौन्सिल सदस्यपदी मनोहर जोशी यांची बिनविरोध निवडडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे ४ मे रोजी पणजी गोवा येथे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन

जाहिरात

 

महाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेत ध्वजारोहण उत्साहात

schedule01 May 26 person by visibility 127 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने कोल्हापूर महापालिकेच्या वतीने आज कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. महापौर रुपाराणी‍ निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 यावेळी महापौर रुपाराणी निकम यांनी उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत माझा माझा महाराष्ट्र माझा, नतमस्कम मी शिवाजीराजा, वंदन करते मी आज या भगव्या ध्वजा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा असे गौरवोद्वार व्यक्त केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ राज्य निर्मितीचा संघर्ष अणि महाराष्राारला मिळालेल्या स्थानाचा अभिमान वाटतो. महाराष्ट्राचा खूप मोठा इतिहास आहे. हा महाराष्ट्र घडण्यासाठी अनेक महापूरषांनी आपले संपुर्ण आयुष्य वेचलं सांगितले.
 कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रगतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून, महापालिकेचा भक्कम पाया हा कर्मचारी वर्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्यबळ कमी असतानाही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उत्तम पद्धतीने कामकाज सांभाळत असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले.  

 यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, नगरसेवक संजय मोहिते, सुनिल वाडकर, अभिजीत मोकाशी, नगरसेविका वंदना मोहिते, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, कामगार अधिकारी राम काटकर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर सतीश साळोखे, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, मुख्याध्यापक, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes