SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूगोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी व उपनिबंधक देविदास मिसाळ यांचेविरुद्ध अवमान याचिका दाखल होणारसफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने कार्यवाही करावी : शेरसिंग डागोरस्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणहॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करा : आपची मागणी केआयटीमध्ये ‘कल्पनेपासून उद्योगापर्यंत’ या कार्यशाळेचे आयोजनअंगदान दिन: जीवनदानाची अपूर्व संधीकाळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले ; गुरुवारपासून कोल्हापूर शहराला दररोज पाणी पुरवठागांधीनगर येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना सक्त कारावासाची शिक्षाविद्यार्थ्यांना करियर संधीसाठी प्रसारमाध्यमे महत्वाची : आर.जे.मनीष

जाहिरात

 

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

schedule13 Aug 26 person by visibility 191 categoryराज्य

कोल्हापूर : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते शनिवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

ध्वजारोहण समारंभासाठी गणवेशधारी अधिकारी नियमानुसार पोशाख करतील, तर नागरिक व शासकीय अधिकारी हे राष्ट्रीय पोशाख परिधान करतील. ध्वजारोहण समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर उपस्थित रहावे.  सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes