SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभशिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेटकोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळेकळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भररिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहितीतात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरेडी. वाय. पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करारराष्ट्रीय प्रेस दिन: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि वृत्तपत्रांची जबाबदारी

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरे

schedule16 Nov 26 person by visibility 557 categoryशैक्षणिक

▪️तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न

वारणानगर : दुग्ध उत्पादन आणि पशुवैद्यकीय शिक्षण यांची प्रभावी सांगड वारणानगरमध्ये घालण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासोबतच हे महाविद्यालय आपल्या गुणवत्तेच्या आणि कार्यपद्धतीच्या माध्यमातून वेगळेपणा जपेल, असा विश्वास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला. 

तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते.

पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्यासाठी परदेशी कंपन्या तसेच परदेशी विद्यापीठांशी चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयावर दाखविलेला विश्वास निश्चितच सार्थ ठरेल आणि या विश्वासाचे सोने होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सुरू झालेले तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय हे पुणे विभागातील पहिले पशुवैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.

वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील यांनी आपल्या मनोगतात वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या यशस्वी शैक्षणिक परंपरेचा आढावा घेतला. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षात दोन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवावे, असा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच महाविद्यालयात तज्ज्ञ, कुशल आणि अनुभवी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

 वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी यांनी वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पीएच.डी. स्तरापर्यंत शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असून, राज्यात सार्वजनिक विद्यापीठ म्हणून वारणा विद्यापीठ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

 पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह देशातील विविध राज्यांमधून प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

संचालक, व्हेटर्नरी हेल्थ सायन्सेस, डॉ. के. एस. पाटील यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधा, उपक्रम आणि संधींची माहिती दिली.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. आर. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना प्रथम वर्षातील अभ्यासक्रम, शैक्षणिक शिस्त आणि महाविद्यालयीन जीवनातील महत्त्वाच्या बाबींविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विवेक कासराळीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील तांदळे यांनी केले. मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश कांबळे यांनी केले.

◼️तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाची पहिली बॅच हा वारणा उद्योग व शिक्षण समूहाच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. पशुवैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था, दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महाविद्यालयाने नवी सुरुवात केली आहे. आधुनिक शैक्षणिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि व्यावहारिक प्रशिक्षण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम पशुवैद्यकीय व्यावसायिक म्हणून घडविण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे. या पहिल्या बॅचच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीचा पाया घातला जात आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes