साके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
schedule16 Nov 26 person by visibility 148 categoryसामाजिक
साके : साके गावातील निलेश नामदेव पाटील यांचे दुर्दैवी घटनेत निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर शोकाकुल पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी नरेंद्र मोदी विचार मंच, पश्चिम महाराष्ट्राच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच स्वमन मानवाधिकार परिषदेच्या महिला अध्यक्षा शर्विकाताई उर्फ पूनमताई तोडकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी त्यांनी निलेश पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगात कुटुंबीयांनी धीर धरावा, त्यांच्यावर आलेल्या दुःखात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास दिला.
दुःखाच्या प्रसंगी केवळ सहवेदना व्यक्त न करता प्रत्यक्ष कुटुंबीयांपर्यंत पोहोचून त्यांना मानसिक आधार देणे, हीच खऱ्या सामाजिक बांधिलकीची ओळख असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.