SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभशिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेटकोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळेकळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भररिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहितीतात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरेडी. वाय. पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करारराष्ट्रीय प्रेस दिन: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि वृत्तपत्रांची जबाबदारी

जाहिरात

 

कळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर

schedule16 Nov 26 person by visibility 199 categoryराज्य

कोल्हापूर : कळंबा तर्फ ठाणे (ता. करवीर) : ग्रामपंचायतीने केवळ शासकीय निधीवर अवलंबून न राहता स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. याच उद्देशातून कळंबा ग्रामपंचायतीने भाजी मार्केट परिसरात व्यावसायिक गाळ्यांची उभारणी करून उत्पन्नवाढीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या नूतन व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन रविवारी (दि. १५) आ. सतेज पाटील यांच्या हस्ते  झाले.

या व्यावसायिक गाळ्यांच्या उभारणीमुळे ग्रामपंचायतीला वर्षाला सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच भविष्यात आणखी ३० गाळे उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी आ. सतेज पाटील यांनी केले.

या उद्घाटन सोहळ्याला आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपसरपंच मीना गौड, पंचायत समिती सदस्य अनिल म्हेत्रे, ग्रामपंचायत अधिकारी विलास राबाडे, माजी सरपंच विश्वास गुरव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय जाधव यांनी केले, तर सरपंच सुमन गुरव यांनी विकासकामांची माहिती दिली.

बाजारपेठेचा विकास करताना पार्किंगची सुविधा अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करून आ. पाटील यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. गरज पडल्यास चार गाळे कमी करूनही ग्राहकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था करावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, भविष्यात भाडेवाढीवरून वाद निर्माण होऊ नये, यासाठी आताच भाडेवाढीचा ठराव करून ठेवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, कळंबा परिसराचे वाढते शहरीकरण पाहता या भागाचे महत्त्व सातत्याने वाढत असून, मूलभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने घेतलेला हा निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes