SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 'महा-पल्स एआय' प्रकल्पाचा शुभारंभशिरोली-किणी या मार्गावरील अपघातांचे ऑडिट करण्यात यावे : अपर जिल्हाधिकारी अजय पवारप्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरूसाके येथे शोकाकुल पाटील कुटुंबीयांची पूनम तोडकर यांनी घेतली सांत्वनपर भेटकोल्हापूर महानगरपालिका कारभारावर 'आप'चा संताप: नगरसेवकांकडे प्रशासनाला गतिमान करण्याचे कौशल्य नाही : अभिजीत कांबळेकळंब्यात व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन; ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भररिंगरोडच्या दर्जेदार विकासासाठी दीड कोटींचा निधी लवकरच मिळणार: नगरसेवक अभिजित खतकर यांची माहितीतात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय वेगळेपणा जपेल : डॉ. विनय कोरेडी. वाय. पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करारराष्ट्रीय प्रेस दिन: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि वृत्तपत्रांची जबाबदारी

जाहिरात

 

डी. वाय. पाटील साळोखेनगरचा ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स’शी सामंजस्य करार

schedule16 Nov 26 person by visibility 183 category

साळोखेनगर : येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी ‘टेस्ट ग्रँड सोल्युशन्स प्रा. लि.’ या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन विभागाच्या पुढाकाराने झालेल्या या करारामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजेनुसार तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी निर्माण होणार आहे.

या करारांतर्गत विद्यार्थ्यांसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण, इंटर्नशिप, औद्योगिक भेटी आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच हॅकथॉन व कोडिंग स्पर्धांसाठी प्रत्यक्ष उद्योगसमस्यांवर आधारित संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील ज्ञानासोबतच उद्योगक्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार असून, आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

याप्रसंगी कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले की, शैक्षणिक संस्था आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याबरोबरच त्यांच्या तांत्रिक क्षमतांना योग्य दिशा मिळेल आणि भविष्यातील करिअरसाठी त्यांची तयारी अधिक प्रभावी होईल.

यावेळी कंपनीचे संचालक अनिरुद्ध मांगोरे,  प्राचार्य डॉ. सुरेश माने आणि प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील आदी उपस्थित होते.
 कराराच्या समन्वयाची भूमिका प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन अधिकारी प्रीती भोसले यांनी पार पाडली.

 संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील आणि देवश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes