SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल कोल्हापूरमध्ये 'इको क्लब'चे उद्घाटनतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे विसाव्या शतकातील महत्त्वाचे प्रबोधनपुरूष: किशोर बेडकीहाळ; शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभअक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पन्हाळगडावर निषेधकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवडशनि शिंगणापूर गावात चोरी : श्रद्धेवरच प्रश्नचिन्ह?कॅप्टन शुभांशू स्वागतम्, आम्हाला आपला अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या नामांकित कंपनीत निवडकोल्हापूर : कावळा नाका पार्किंगमध्ये ट्रॅव्हल्स स्थलांतराची तयारी; प्रशासक के.मंजूलक्ष्मी व पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांची संयुक्त पाहणीकोल्हापुरात अनधिकृत अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई : 5 हातगाड्या, 15 स्टॅण्ड बोर्ड, स्वागत कमान जप्तपन्हाळा तहसिल कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन

जाहिरात

 

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे यशस्वी आयोजन

schedule23 Aug 24 person by visibility 502 categoryराज्य

कोल्हापूर : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव सन 2024- 25 चे आयोजन महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि. कोल्हापूर, टाकाळा येथे संपन्न झाला. 

यावेळी आमदार सतेज डी. पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी गृह विज्ञान शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा ठोंबरे, करवीर विभागीय कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे, कोल्हापूर विभागीय कृषि अधिकारी जयश्री हावळे, करवीर तालुका कृषि अधिकारी बंडा कुंभार तसेच कृषि विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

 या कार्यक्रमाची सुरुवात अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कृषि विभागामार्फत विविध महोत्सव तसेच नाविण्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांसाठी राबवित आहे, यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या वापर आपल्या दैनंदिन आहारात करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते. या भाज्यांचे संवर्धनही करणे गरजेचे असल्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

आमदार सतेज डी. पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला व महोत्सवातील रानभाज्या प्रदर्शनाला भेट दिली. आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, सिध्दगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी शास्त्रज्ञ डॉ. प्रतिभा ठोंबरे यांनी महोत्सवाला उपस्थित सर्वांना रानभाज्या विषयी सविस्तर माहिती दिली. 

 रानभाज्यांचे नमुने व त्यांची पाककृती स्पर्धेतून निवडलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महोत्सवातील रानभाज्या प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट देवून रानभाज्या विषयी माहिती जाणून घेतली. सुमारे 350 महिला शेतकरी व शेतकरी गटांनी रानभाजी महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामध्ये शेवगा, करटुले, रान, कोवळे बांबू, अळू, लाल, केन, पाथरी, मटारु, कपाळफोडी, आघाडा, आंबाडा, व्हनगोती, रान कारली, माठ, भांगीरा, घोळ, कुर्ड, गुणुवली, शेंडवेल, तोंडली इ. रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes