SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळलेडी. वाय. पाटील आर्किटेक्चरचा 'ऊर्जा कार्यक्षम बस स्टॉप' प्रथमरमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्रीपर्यावरण संतुलनासाठी सामाजिक वनीकरण काळाची गरजमाणगाव परिषदेतून सामाजिक बदलाची खरी सुरुवात : जिल्हाधिकारी अमोल येडगेपवित्र रमजान ईद: संयम, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा मंगल सोहळाभारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ: सनईचे जादुगार आणि भारतीय संस्कृतीचे दूतऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचना

जाहिरात

 

मधुमेहग्रस्त सात वर्षांच्या साक्षी वर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

schedule28 Dec 25 person by visibility 763 categoryआरोग्य

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील सात वर्षांची साक्षी सनी कांबळे हिच्या आयुष्यात पुन्हा एकदा उजेड आला आहे. जन्मजात मधुमेहाचा त्रास असूनही तिच्या डाव्या डोळ्यावरील मोतीबिंदूची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया उघमनगर येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली.

साक्षीला जन्मापासूनच मधुमेह असून दिवसातून दोन वेळा इन्सुलिन द्यावे लागते .सेटिंग काम करणारे तिचे वडील आणि घरकाम करणारी आई हे सरावाने ही जबाबदारी पार पाडत असतात. मधुमेह असल्याने शस्त्रक्रिया करणे हे मोठे आहवान होते. चैतन्य आय केअर फाउंडेशन - घरपणच्या अद्ययावत फिरत्या नेत्रतपासणी उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तपासणी सुरू असताना, सुमारे अडीच महिन्यांपूर्वी  झालेल्या तपासणीत साक्षीला मोतीबिंदू असल्याचे निदर्शनास आले.

मधुमेह नियंत्रणात असतानाच शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याने वालावलकर हॉस्पिटलचे प्रमुख  डॉ. संतोष कुलकर्णी,  नेत्रतज्ञ  डॉ. वीरेंद्र वणकुद्रे व त्यांच्या संपूर्ण टीमने सखोल चर्चा करून योग्य नियोजन केले. साक्षीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता,संतोष कुलकर्णी यांच्या समन्वयाने मनिषा रोटे सिस्टर्स यांच्या समावेत ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. एकंब फाउंडेशन  मुंबई यांचे ही यासाठी भरीव योगदान लाभले आहे . दुसऱ्या दिवशी डोळ्यावरील पट्टी काढल्यानंतर साक्षीला सुमारे पाच फूट अंतर स्पष्ट दिसू लागले. हे दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि आनंदाने संपूर्ण वैद्यकीय पथकाला आपल्या कष्टांचे चीज झाल्याची जाणीव करून दिली.

दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत घातल्यानंतर फळ्यावरचे नीट दिसत नाही, डोळ्यांसमोर अंधारी येते किंवा मोठ्या वाहनांच्या दिव्यांचा त्रास होतो अशा तक्रारी केल्यास तात्काळ नेत्रतपासणी करून घ्यावी, असे आवाहन वालावालकर हॉस्पिटल व चैतन्य आय केअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.त्यामुळे लहान मुलांतील डोळ्यांचे आजार वेळीच लक्षात घेऊन त्यांच्यावर योग्य वेळी उपचार झाल्यास आगामी काळात त्यांची ही समस्या मोठ्या प्रमाणात आवाक्यात येवू शकते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes