SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऐतिहासिक माणगाव परिषदेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार :जिल्हाधिकारी अमोल येडगेविद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्रजनकल्याणाच्या योजना गावागावात पोहोचवून कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श बनवण्याचे काम नूतन पदाधिकारी आणि सदस्यांनी करावे: खासदार धनंजय महाडिक यांची सूचनादऱ्याचे वडगाव इथल्या आपत्तीग्रस्तांना आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात; स्वनिधीतून दिली मदतयेत्या मंगळवारी नोकरी इच्छूक महिला उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनउत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - मुदतवाढकोल्हापूरात ‘संपूर्ण गीतरामायण’चा भव्य सोहळा : २३ ते २६ मार्च दरम्यान आयोजनकोरे अभियांत्रिकेत बौद्धिक संपदा हक्क जागरूकता विषयावरील कार्यशाळेचे आयोजनमाणगाव परिषद : सामाजिक क्रांतीचा एल्गारचिवचिव हरवलीय कुठे? : जागतिक चिमणी दिन आणि आपली जबाबदारी

जाहिरात

 

विद्यापीठात जीएसटी सुधारणांबाबत सोमवारपासून राष्ट्रीय चर्चासत्र

schedule20 Mar 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक

  कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातर्फे येत्या सोमवारी (दि. २३) दोनदिवसीय 'जीएसटी' (वस्तू आणि सेवा कर) याविषयी राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या चर्चासत्रात जीएसटी सुधारणा, त्याचे परिणाम आणि 'विकसित भारत २०४७' या मुख्य मुद्द्यावर जीएसटी क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

  वस्तू व सेवा कराचे आयुक्त सुरेंद्र माणकोस्कर यांच्यासह कलबुर्गी केंद्रीय विद्यापीठाचे प्रा. पांडुरंगा हे चर्चासत्राचे मुख्य मार्गदर्शक आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी असतील.

  इतर सत्रांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सीए उमेश शर्मा व कोल्हापूर मधील सीए गिरीश कुलकर्णी डिजिटायझेशन आणि वस्तू व सेवा कर या विषयावर विवेचन करतील.

  वस्तू व सेवा करातील सुधारणा व त्याचा व्यवसाय व ग्राहकांवर परिणाम या विषयावर विशेष चर्चेचे आयोजन चर्चासत्रामध्ये करण्यात आलेले आहे यामध्ये आयुक्त महेश जगताप, सीए गिरीश सामंत, व्यावसायिक अजित कोठारी, अंतर्गत लेखापरीक्षक अजित चौगुले, सीए श्रीकांत बच्चे चर्चेत सहभाग घेतील. याचे अध्यक्षस्थान प्रा. श्रीकृष्ण महाजन भूषवतील.

  वस्तू व सेवा कर यातील सुधारणा आणि व्यवसाय सुलभता या विषयावरील सत्र मध्ये धारवाड येथील प्रा.अंजू ताम्रगुंडी व गोवा येथील प्राचार्य डॉ. नामदेव गवस आपले विचार मांडतील.

  वस्तू व सेवा कर सुधारणा आणि डिजिटायझेशन या विषयाला वाहिलेल्या सत्रामध्ये कौशाली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, धारवाड येथील डॉ. रमेश कुलकर्णी व सायबर इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. आर के टेलर हे मार्गदर्शन करतील.

  उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक व व्यावसायिक हे वस्तू व सेवा कर तसेच व्यवसाय सुलभता आणि डिजिटायझेशन या विषयावर शोधनिबंधांचे सादरीकरण करणार आहेत. देशभरातून या चर्चासत्रासाठी 100 हून अधिक सदस्यांनी नोंदणी केलेली असून सुमारे 50 सहभागी सदस्य शोधनिबंध सादर करणार आहेत. या चर्चासत्राचा कर व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes