SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्चधर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शनबाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्न

जाहिरात

 

शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी

schedule24 Jul 26 person by visibility 225 categoryसामाजिक

कोल्हापूर  : शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना ही गरजू, होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले.
वडणगे तालुका करवीर येथील शिवसाई कला  क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या विद्यार्थी दत्तक योजनेतील शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील, सरोज कास्टींगच्या डायरेक्टर सौ.छाया अजित जाधव उपस्थित होत्या.

वडणगे येथील शिवसाई मंडळाने २४ वर्षांपूर्वी उत्सवातील गणेश खर्चाला फाटा विद्यार्थी दत्तक योजना  सुरू केली . या योजनेतील २५ विद्यार्थ्यांना यंदा मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सरोज कास्टिंग्सचे अजित जाधव यांचे यासाठी सहकार्य लाभले. 

डॉ.खिलारी  म्हणाले की, जीवनात मदतीची भावना ठेवा. अभ्यासू वृत्ती ठेवा .सर्वोत्तम बनण्याचे ध्येय  ठेऊन प्रयत्न करा, यश मिळेल असा सल्ला त्यांनी दिला.


सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी नीता सूर्यवंशी पाटील म्हणाल्या, शिक्षणासाठी  मदत हेच खरे दान आहे .यामुळे कुटुंब , समाज आणि देश बलशाली होतो. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

सरोज कास्टिंग डायरेक्टर  छाया जाधव यांनी सांगितले की , शिवसाई मंडळाचे कार्य आदर्शवत असून इतर मंडळांनी नक्कीच त्याचे अनुकरण करावे. या विधायक उपक्रमात आम्हाला सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी शिवसाई मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. मंडळाने गेल्या २४ वर्षात ३२५ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहेत. या उपक्रमातील विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाले आहेत.आपण जर एखादे विधायक काम सुरू करून ते चिकाटीने आणि सातत्याने पुढे नेले तर समाजातील दातृत्वाचे अनेक हात मदतीसाठी पुढे येतात, असेही त्यांनी सांगितले.

शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. देवणे यांनी सांगितले की, शिवसाई  मंडळाने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत, विद्यार्थी दत्तक योजना राबवून मंडळाच्या तरुणांनी  सामाजिक भान जपले आहे.
 
यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील,उपाध्यक्ष आर.एस.पाटील , संचालक राजाराम अस्वले, आण्णासाहेब देवणे , युवराज शेलार, विलास कुंभार,उद्योगपती  शिवाजीराव पाटील सरोज कास्टिंगचे एचआर हेड अमेय पार्टे, डी.वाय. पाटील हॉस्पिटलचे असिस्टंट रजिस्ट्रार अजित पाटील , रणजीत कल्याणकर , रवी मोरे,  शिवसाईचे अध्यक्ष अक्षय पाटील, संभाजी चव्हाण, योगेश माने,विक्रम पाटील ,प्रदीप चौगले यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 के. व्ही. इरुडकर यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes