SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्चधर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शनबाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहनआषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटपकसबा बावड्यात १४० चिमुकल्या वारकऱ्यांचा सहभाग; पर्यावरणपूरक आषाढी वारी उत्साहात आरोग्य सेवा आयुक्त काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठक संपन्न

जाहिरात

 

आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना ‘गोकुळ’ तर्फे सुगंधी दूध व सार्थ हरीपाठ वाटप

schedule25 Jul 26 person by visibility 184 categoryउद्योग

◼️गोकुळचा स्वच्छतेचा संदेश; जनजागृती फलकांनी वेधले लक्ष

कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्यावतीने कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांना मोफत सुगंधी दूध आणि सार्थ हरीपाठ पुस्तिकांचे वाटप पुईखडी येथील रिंगण सोहळा परिसरात करण्यात आले. वारकऱ्यांची सेवा करण्याबरोबरच स्वच्छतेचा संदेश देण्याचाही उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

 यावेळी गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वारकऱ्यांना सुगंधी दूध, हरीपाठ पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

"आपली दिंडी – स्वच्छ दिंडी", "एक पाऊल भक्तीकडे... एक पाऊल स्वच्छतेकडे", "दूध पिऊया... पिशवी कचरापेटीत टाकूया", "माऊलींची वारी, स्वच्छतेची जबाबदारी" असे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक गोकुळ तर्फे रिंगण सोहळा परिसरात लावण्यात आले होते.

  विशेष म्हणजे, दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गोकुळच्या १५ स्वयंसेवकांनी यांनी दूध वाटप करण्यात आलेल्या परिसरातील रिकाम्या दुधाच्या पिशव्या व इतर कचरा गोळा करून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेचा संदेश केवळ फलकांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीतूनही गोकुळने सामाजिक बांधिलकी जपली. वारकरी सेवा, स्वच्छतेची जनजागृती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणारा गोकुळचा हा उपक्रम उपस्थित वारकरी व नागरिकांच्या पसंतीस उतरला.

  या कार्यक्रमप्रसंगी संघाचे डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, प्रविण देसाई, संतोष पाटील, प्रमोद घोडके, उल्हास पाटील, वसंत माळवी, संघाचे मार्केटिंग विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच महिला मदतनीस आदि मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes