स्वच्छता मोहिमेत 20 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाव
schedule03 Nov 26 person by visibility 170 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : माझे शहर माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत शहरात स्वच्छता मोहिम राबविणेचे निर्देश महापौर रुपाराणी निकम यांनी दिले आहेत. त्यानुसार आज सकाळी 7 ते 10 या वेळेत खानविलकर पेट्रोल पंप, 100 फुटी रोड, विंन्स हॉस्पीटल परिसर, महावीर गार्डन परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व नागाळा पार्क या मेनरोड ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
ही स्वच्छता मोहिम महापौर रुपाराणी निकम यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत 20 टण खरमाती, स्वच्छता करुन कचरा प्लॅस्टिक, डिव्हाईटरची स्वच्छता, तणकट, झाडांचे कटिंग व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेसाठी 2 आयवा डंपर, 2 ट्रॅक्टर 1 जेसीबीचा वापर करण्यात आला.
या मोहिमेत सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, नगरसेविका सौ.पल्लवी देसाई, उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक प्रकाश लोंढे, आनंदा बावडेकर, महापालिका आरोग्य व विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केटकडील पवडी विभागाचे 70 कर्मचारी व नागरीकांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.