SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची सादकेंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल : खासदार धनंजय महाडिककागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणीराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, पालकांनी सहकार्य करावे : आरोग्याधिकारी प्रकाश पावरास्वच्छता मोहिमेत 20 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाववारणा दूध संघामार्फत तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ६ नोव्हेंबरला जातिवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन चिपको आंदोलनाच्या खऱ्या सहचारिणी : विमला बहुगुणा

जाहिरात

 

वारणा दूध संघामार्फत तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ६ नोव्हेंबरला जातिवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन

schedule03 Nov 26 person by visibility 172 categoryउद्योग

◼️वारणा श्री म्हैस व वारणा श्री गाय पुरस्कासह भरगच्च बक्षिसे 
वारणानगर : तात्यासाहेब कोरेनगर येथील  श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ व तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय महाविद्यालय,वारणानगर  यांचे तर्फे जातिवंत दुधाळ जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहीती वारणा समुहाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी दिली.
 वारणा दूध संघामार्फत सहकारमहर्षी  तात्यासाहेब कोरे यांचे ११२ व्या जयंती निमित्त धनत्रयोदशी दिनांक ६ नोव्हेंबरला सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जातिवंत जनावरांचे प्रदर्शन होणार आहे.

 यामध्ये म्हैस,रेडी,गायी, कालवड व रेडे असे जनावरांचे गट राहणार आहे म्हैस गटात वारणा श्री म्हैस पुरस्कारसाठी २५००१ रूपये व चषक आणि वारणा श्री गाय पुरस्कारसाठी २१००१ व चषक देण्यात येणार आहे म्हैस गटात प्रथम क्रमांकासाठी ८००१ रुपये, द्वितीयसाठी ७००१ रूपये, तृतीयसाठी ६५०१ रुपये, चतुर्थसाठी ६००१ रुपये व पाचव्या क्रमांकासाठी ५५०१ रुपये तसेच गाय गटात प्रथम क्रमांकासाठी ७००१ रुपये, द्वितीयसाठी ६००१ रुपये,तृतीयसाठी ५५०१ रुपये, चतुर्थसाठी ५००१ रूपये व पाचव्या क्रमांसाठी ४५०१ रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत यासह सहभागी झालेल्या जनावरांमधून निवड समितीने निवडलेल्या उत्कृष्ठ जनावरांना देखील २००१ रूपयांची उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवली आहेत.

 शेतकरी दूध उत्पादकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे  आवाहन संघाचे अध्यक्ष एच.आर. जाधव व कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले आहे.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष अँड एन.आर.पाटील,संकलन व पशुवैद्यकीय व्यवस्थापक डॉ.जे.बी.पाटील व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes