SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची सादकेंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल : खासदार धनंजय महाडिककागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणीराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, पालकांनी सहकार्य करावे : आरोग्याधिकारी प्रकाश पावरास्वच्छता मोहिमेत 20 टण प्लॅस्टिक, तणकट व खरमाती उठाववारणा दूध संघामार्फत तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त ६ नोव्हेंबरला जातिवंत जनावरांचे भव्य प्रदर्शन चिपको आंदोलनाच्या खऱ्या सहचारिणी : विमला बहुगुणा

जाहिरात

 

गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची साद

schedule03 Nov 26 person by visibility 227 categoryसामाजिक

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीत साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २१ पैकी १३ जागांवर समविचारी आघाडीला स्पष्ट बहुमत देऊन आपला कौल दिला होता. मात्र, २९ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या अध्यक्ष निवड सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक ठरवून गैरहजर राहिले. यामुळे गणपूर्ती न झाल्यामुळे तांत्रिक कारणास्तव सभा तहकूब करावी लागली. पराभव समोर दिसत असताना तो मान्य करण्याऐवजी प्रशासकीय प्रक्रिया आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार सुरू असल्याचा तीव्र संताप आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी व्यक्त केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व संपादक व पत्रकारांना एक सविस्तर निवेदपत्र पाठवून लोकशाहीच्या रक्षणासाठी कळकळीची विनंती केली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जर केवळ तांत्रिक कारणांमुळे जनतेचा कौल डावलला जात असेल आणि गोकुळमधील बहुमतासाठी कायदा बदलण्याची किंवा शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन संख्याबळ फिरवण्याची चर्चा होत असेल, तर या निवडणुका घेण्याचा अर्थच काय उरतो? आज गोकुळसाठी आणलेला हाघातूक कायदा उद्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेसारख्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही लागू केला जाऊ शकतो, ज्याद्वारे स्वीकृत सदस्यांमार्फत लोकशाहीची सर्रास गळचेपी केली जाऊ शकते.

सध्या गोकुळमध्ये प्रशासकीय राजवट सुरू असून या काळात तोटा वाढत चालला आहे. दुष्काळ आणि चाऱ्यासारख्या गंभीर प्रश्नांसमोर निर्णय घेण्यासाठी आज गोकुळमध्ये कोणतेही लोकनियुक्त मंडळ अस्तित्वात नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण विरोधी संचालकांनाही नम्र आवाहन केले आहे की, त्यांनी शेतकऱ्यांचा कौल स्वीकारून पुढील सभेला आवर्जून उपस्थित राहावे.
कायद्याच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने हा लढा कायम सुरू ठेवला जाईल, असे स्पष्ट करत आमदार सतेज पाटील यांनी वृत्तपत्रसृष्टीला साद घातली आहे. 

आज गोकुळमध्ये जे काही सुरू आहे, ती भविष्यात कोणत्याही संस्थेत घडू शकते. त्यामुळे महाराष्ट्राचा सहकाराचा गौरवशाली वारसा जपण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी गोकुळच्या साडेपाच लाख शेतकऱ्यांचा खरा आवाज बनून जनतेसमोर वास्तव मांडण्याचे आवाहन त्यांनी या निवेदनातून केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes