SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
‘स्फोटके नियम २००८’ मध्ये सुधारणेसाठी केंद्राला प्रस्ताव सादर करणारराज्यभर गुटखा माफियांचे धाबे दणाणले: १९५ ठिकाणी धाडी, २ कोटींचा मुद्देमाल जप्त! १९२ व्यक्तींना अटकराज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मोसमी पावसाचे राज्यात आगमन, मात्र सर्वदूर सक्रियतेसाठी १५ जूनची प्रतीक्षा; बळीराजाची नजर आकाशाकडे!"डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवडअवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावाकरिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास सहकाराचा इतिहास 'दत्ताजीराव कदमां'शिवाय अपूर्ण; शरद पवारांकडून कार्याचा गौरवदूरशिक्षण केंद्राच्या एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरीचे आयोजन जागतिक अन्न सुरक्षा दिन: सुरक्षित अन्न, निरोगी आरोग्य!

जाहिरात

 

‘गोकुळ’ मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

schedule06 Jun 26 person by visibility 239 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्य संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक यांच्या हस्ते व प्रशासकीय मंडळाचे सदस्य, अधिकारी यांच्‍या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, औक्षण करण्यात आले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी संघाचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रीक, सदस्य प्रदीप मालगावे, सागर बलकवडे, डॉ.चंद्रकांत परूळेकर, गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.दयावर्धन कामत, धनाजी पाटील, डॉ.प्रकाश दळवी, अशोक पुणेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes