दूरशिक्षण केंद्राच्या एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरीचे आयोजन
schedule07 Jun 26 person by visibility 115 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रा मार्फत एम.बी.ए. ( डिस्टन्स मोड) या अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेनुसार विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया फेरी मंगळवार दि.०९ जून २०२६ रोजी सकाळी नऊ वाजता राबविण्यात येणार असल्याची माहिती संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी दिली आहे.
एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद यांची मान्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्केटिंग,मानवी संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन आणि प्रोडक्शन व्यवस्थापन तसेच वित्तीय व्यवस्थापन या विषयातून एमबीए( डिस्टन्स मोड) पूर्ण करता येणार आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिलेली आहे.अशा विद्यार्थ्यांनी दूर शिक्षण केंद्राच्या मुख्य कार्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे,असे आवाहन संचालक डॉ.कृष्णा पाटील यांनी केले आहे.