डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवड
schedule07 Jun 26 person by visibility 109 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील प्रतिष्ठीत क्लिंजनबर्ग कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक सहा लाख रुपयांचे आकर्षक वेतन पॅकेज प्राप्त झाले आहे.
जर्मनीस्थित क्लिंजनबर्ग ही गिअर तंत्रज्ञान, ड्राईव्ह सिस्टीम्स, औद्योगिक ऑटोमेशन आणि उच्च परिशुध्दता मापन तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनी आहे. अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी अभियांत्रिकी उपयांसाठी कंपनी जागतिक स्तरावर ओळखली जाते. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारी क्लिंजनबर्ग ही कंपनी अभियांत्रिकी क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एआयडीस विभागातून शाहुराजे पाटील, एआयएमल विभागातून ओंकार बरद, सोनाली पाटील, कॉम्प्युटर विभागातुन कोमल यंगल, साहिल मकानदार व मेकॅनिकलमधून विश्वराज पाटील यांचा समावेश आहे. डीकेटीई ही संस्था विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, कौशल्य विकास आणि गुणवत्तापुर्ण प्लेसमेंट देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशिल आहे यामुळे नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.के.शिरगावे, डॉ व्ही.आर.नाईक, डॉ डी.व्ही.कोदवडे, डॉ टी.आय.बागबान, टीपीओ जी.एस.जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.