SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन पोलांडच्या संसदीय शिष्टमंडळाची कोल्हापूर भेट: वळीवडे पोलीश संग्रहालय प्रकल्पाला गतीशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना कोल्हापुरात आदरांजली; शहरात भव्य स्मारक उभारण्याचा सर्वपक्षीय निर्धार!भारतीय ग्रंथालय दिन: ज्ञान आणि वाचनाचा उत्सवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर जिल्हा दौराअंब्रेला संस्थेमुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहलिंगायत समाजाच्या प्रलंबित व न्याय मागण्यांसाठी कोल्हापुरात रविवारी साखळी उपोषणमहाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती; पुढील तीन वर्षांसाठी कार्यकाळपदभरती, पदोन्नतीला गती द्या : मंत्री प्रकाश आबिटकर‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

जाहिरात

 

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती; पुढील तीन वर्षांसाठी कार्यकाळ

schedule08 Aug 26 person by visibility 215 categoryराज्य

मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या कृषि व पशुसंवर्धन विभागातर्फे शेखर मीना रामबिलास मुंदडा यांची 'महाराष्ट्र गोसेवा आयोगा'च्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) पुनर्नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतची अधिकृत राजपत्र अधिसूचना ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आली आहे. या पदाचा कार्यकाळ राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून पुढील तीन वर्षांचा असणार आहे.

यापूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी गोवंश संरक्षण, संवर्धन आणि 'राज्यमाता गोमाता संवाद यात्रे'च्या माध्यमातून गोसंवर्धनाबाबत राज्यभरात प्रभावी जनजागृती केली होती. त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची व अनुभवाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पुन्हा सोपवली आहे.

◼️आयोगाची आगामी मुख्य उद्दिष्टे:
 * ब्राऊन रिव्ह्युलेशन (शेण व गोमूत्र उपउत्पादने) चळवळ व्यापक करणे.
 * 'गो-10' ब्रँड अंतर्गत गोमय उत्पादनांचे विक्री व्यवस्थापन व मूल्य साखळी विकसित करणे.
 * गोशाळांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
 * गोसंवर्धन व संगोपनाबाबत व्यापक लोकजागृती करणे.
या पुनर्नियुक्तीमुळे राज्यातील देशी गोवंशाचे रक्षण, चारा उत्पादन आणि गोशाळांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पशुसंवर्धन व गोसेवा क्षेत्रातील घटकांकडून व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes