SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचे आगमन पोलांडच्या संसदीय शिष्टमंडळाची कोल्हापूर भेट: वळीवडे पोलीश संग्रहालय प्रकल्पाला गतीशिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना कोल्हापुरात आदरांजली; शहरात भव्य स्मारक उभारण्याचा सर्वपक्षीय निर्धार!भारतीय ग्रंथालय दिन: ज्ञान आणि वाचनाचा उत्सवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर जिल्हा दौराअंब्रेला संस्थेमुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी: केंद्रीय सहकार मंत्री अमित शाहलिंगायत समाजाच्या प्रलंबित व न्याय मागण्यांसाठी कोल्हापुरात रविवारी साखळी उपोषणमहाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती; पुढील तीन वर्षांसाठी कार्यकाळपदभरती, पदोन्नतीला गती द्या : मंत्री प्रकाश आबिटकर‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ

जाहिरात

 

शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना कोल्हापुरात आदरांजली; शहरात भव्य स्मारक उभारण्याचा सर्वपक्षीय निर्धार!

schedule09 Aug 26 person by visibility 209 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापुरात राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारानंतर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे काँग्रेस कमिटीमध्ये एका सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेमध्ये डॉ. पाटील यांच्या कार्याचा गौरव करत शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा महत्वपूर्ण निर्धार सर्वपक्षीय मान्यवरांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये झालेल्या शोकसभेत खासदार शाहू छत्रपती यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी माझी १९७० पासून मैत्री होती. त्यांनी राजकारणात वेगळी छाप पाडत राजकारणापासून दूर होऊन शिक्षण संस्थांचे देशभर जाळे उभे केले आणि बहुजन विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.तीन राज्यांचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले. जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. असे मनोगत व्यक्त केले.

 नामदार हसन मुश्रीफ म्हणाले डी. वाय. पाटील यांच्या आध्यात्मिक वृत्तीमुळे त्यांची नियत आणि दानत अखेरपर्यंत चांगली राहिली.
  महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या "कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात विस्तारलेल्या शैक्षणिक क्षेत्राचा आढावा खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी घेतला, तर कोल्हापुरातील ज्ञानप्रवाहाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त करत डॉ. पाटील यांचे भव्य स्मारक शहरात उभारण्याची गवाही त्यांनी दिली.
 तसेच माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी डॉ. पाटील यांच्या रूपानं बहुजन समाजाचे अष्टपैलू व्यक्तित्व काळानं हिरावून नेलं आहे. अशी भावना व्यक्त केली. शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला सुरू करण्याची सूचना केली.

 यावेळी उदय नारकर, डी. जी. भास्कर, राजू चव्हाण, अनिल लवेकर, बबन रानगे, कौस्तुभ गावडे, हिंदुराव चौगुले, अजितसिंह पाटील, पी. जी. यादव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार गोपाळराव पाटील, उद्योजक व्ही. बी. पाटील, संजय घाटगे, सतीशचंद्र कांबळे, सरला पाटील, गोपाळ मर्दाने, सुभाष जाधव, वसंतराव मुळीक, सीमा पाटील, रणजित जाधव, भगवान पाटील, माजी आमदार राजू आवळे, राजीव आवळे, भूपाल शेटे, वसंत पाटील, सुभाष देसाई, दिलीप पवार, हसन देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, प्रा. किसनराव कुराडे, बाळासाहेब खाडे, आर. के. पोवार, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांच्यासह नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes