SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासननैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवारपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैलाकोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंदआर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्केअंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे ५ जुलै रोजी प्रकाशन; डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यानडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट 'एक्सलंट' श्रेणीत; उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील एक जुलै रोजी करण्यात येणार महामार्ग रोको आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार....

schedule29 Jun 25 person by visibility 340 categoryराज्य

▪️पोलिसांनी दडपशाही करू नये; अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी; बैठकीत देण्यात आला इशारा....
 
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलै रोजी करण्यात येणारे महामार्ग रोको आंदोलन विविध  संघटना,  सर्वसामान्य जनता यांना सोबत घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत
करण्यात आला. महामार्ग रोको आंदोलन संवेदनिक आणि शांततेत पार पाडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मात्र पोलिसांनी दडपशाही करू नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील. असा इशाराही यावेळी देण्यात आला.

  शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिनाच औचित्य साधत एक जुलै रोजी बारा जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हातही शक्तीपीठ महामार्ग विरोधात  पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलाच्या ठिकाणी रोखण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीची अजिंक्यतारा कार्यालय येथे बैठक संपन्न झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर के पोवार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

 गोव्याकडे जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असतानाही,  शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यावर लादण्यात येत आहे. यासाठी 86 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणारं आहे. शेतकऱ्यांच्या 27 हजार एकर सुपीक जमीन संपादित होणार आहे. त्यामुळ अनेक शेतकरी भूमीहिन होणारं आहेत. शक्तीपिठसाठी तरतूद म्हणून वीस हजार कोटींच कर्ज पहिल्या टप्प्यात घेण्यात आलय. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या वर कर्जाचे ओझे वाढणार आहे.

 कॉन्ट्रॅक्टर आणि  महायुतीतील नेत्यांच्या फायद्यासाठी हा शक्तीपीठ करण्याचा घाट घातला जात आहे. असा आरोपही यावेळी करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाला सर्व नागरिकांनी विरोध करायला हवा. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

 याबरोबर सर्व राजकीय पक्ष, कामगार संघटना, शिक्षक संघटना,नागरी संघटना, युवक मंडळे, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि महिला संघटना, वंचितांसाठी लढणाऱ्या संघटना, सर्व नगरसेवक यांनी एक जुलै रोजी होणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनामध्ये सहभागी होऊन हे आंदोलन ताकतीन यशस्वी करण्याच आवाहनही यावेळी करण्यात आल.

 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी, शक्तीपीठ साठी खर्च करण्यात येणारा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला तर दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. मात्र हे टक्केवारीच सरकार आहे. कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या वर हा महामार्ग लादला जात असल्याची टीका त्यांनी केली. सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी हा महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. असे आवाहनही  विजय देवणे यांनी केले. 

 काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी देखील, एक जुलै रोजी करण्यात येणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नको असलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादू नका. कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठीच शक्तीपीठ महामार्ग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान महामार्ग रोको आंदोलन संवेदनिक आणि शांततेत पार पाडण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. मात्र पोलिसांनी दडपशाहीचे धोरण अवलंबल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील. असा इशाराही देण्यात आला.

दरम्यान हिंदी भाषा सक्ती विरोधात 5 जुलै रोजी मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येन सहभागी होणे. तसेच अलमट्टी धरणाची उंची वाढी विरोधात, 10 जुलै रोजी सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होत हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय देखील या बैठकीवेळी घेण्यात आला.

दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविकिरण इंगवले तर भाकपच्या कोल्हापूर जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ कांबळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या बैठकीसाठी राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, बाबुराव कदम, अतुल दिघे, वसंत डावरे, अनिल घाटगे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, भरत रसाळे, दिलीप पवार, कॉम्रेड सुभाष जाधव, बाबासाहेब देवकर, सागर कोंडेकर,  यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते. ‌

▪️या बैठकीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी, महायुती सरकारवर जोरदार टीका केली. महायुतीमधील भ्रष्ट नेत्यांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्ग केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एक जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील. असेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes