SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासननैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवारपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैलाकोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंदआर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्केअंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे ५ जुलै रोजी प्रकाशन; डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यानडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट 'एक्सलंट' श्रेणीत; उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट 'एक्सलंट' श्रेणीत; उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेवर मोहर

schedule02 Jul 25 person by visibility 247 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) ला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडून "एक्सलंट" तसेच व्हेरी गुड श्रेणी प्राप्त झाली असून इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता परंपरेवर पुन्हा मोहर उमटवली गेली आहे. 

मंडळाच्या शैक्षणिक आवेक्षण (मॉनिटरिंग) समितीने डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट मध्ये तपासणी भेट देऊन शैक्षणिक सुविधा - संसाधने, विद्यार्थी केंद्रित उपक्रम, परीक्षांचे निकाल, प्रयोगशाळांची आधुनिकता, इन्स्टिट्यूटचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासन, विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटस,अध्ययन प्रक्रियेची पूर्तता, उद्योगस्नेही उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी, उद्योग क्षेत्राशी सामंजस्य करार, गुणवत्ता सुधारणा उपक्रम, संशोधन क्षेत्रातील सहभाग, इन्स्टिट्यूट मधील वेगवेगळ्या समित्यांचे कामकाज आणि गुणवत्ता, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास उपक्रम, तज्ञांची व्याख्याने, प्रकल्प सादरीकरण अशा अनेक निकषांवर इन्स्टिट्यूटची तपासणी केली. या सर्व निकषांवर इन्स्टिट्यूट उत्तम कामगिरी करत असल्याचे समितीस दिसून आले.

यावेळी इन्स्टिट्यूटमधील सर्व अधिविभागांना समितीने भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परिणामी, इन्स्टिट्यूटला वरील श्रेणी प्राप्त आल्या, अशी माहिती संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक आणि इन्स्टिट्यूटचे प्राचार्य विरेन भिर्डी यांनी दिली. "शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रवाह , आउटकम बेस्ड एज्युकेशन, कौशल्य विकास यांच्या अनुषंगाने विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविण्यासाठी इन्स्टिट्यूट तत्परतेने कार्य करीत राहील" असे त्यांनी नमूद केले. 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे इन्स्टिट्यूटमधील सर्व उपक्रमांना मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी गुणवत्ता मूल्यमापन प्रक्रियेविषयी विशेष ध्यान दिले. इन्स्टिट्यूटला मिळालेल्या या गौरवाबद्दल सर्व विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे अभिनंदन होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes