SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या एमबीए विभागातील ९० हून अधिक विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवर निवडसंजय घोडावत आय . आय . टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेची NEET - २०२५ मध्ये चमकदार कामगिरीबबेराव दादांच्या पायवाटेवरूनच पुढे जाण्याचा आमचा संकल्प : माजी आमदार जयश्री जाधव यांची भावनाप्रशिक्षण काळातच पोलिसांचे समुपदेशन करा : आमदार सतेज पाटील; गांभीर्याने विचार करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासननैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार; आमदार सतेज पाटील यांचा सवाल गडहिंग्लज येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागाने जागा उपलब्ध करून द्यावी : उपमुख्यमंत्री अजित पवारपन्हाळगड-पावनखिंड मोहीम १२ ते १४ जुलैलाकोल्हापूर : निर्जनस्थळी वृध्दाना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंदआर्थिक विकासासाठी आर्थिक साक्षरता, शिस्त महत्त्वाची : कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्केअंमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचे ५ जुलै रोजी प्रकाशन; डॉ. अशोक चौसाळकर यांचे विशेष व्याख्यान

schedule02 Jul 25 person by visibility 248 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक, वक्ते, संवादक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. ५) सायंकाळी ५.३० वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. जत्राटकर यांचे ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होते आहे, तर ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा ललित लेख संग्रह भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

 अनुभवी माध्यमकर्मी डॉ. श्रीरंग गायकवाड आणि राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे हे यावेळी पुस्तकांवर प्रथम भाष्य करणार आहेत. तरी, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक अमेय जोशी आणि भाग्यश्री कासोटे-पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes