SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज दाखल केले १०१ ठरावगोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचे “जोरदार शक्तीप्रदर्शन”; करवीरसह जिल्ह्यातील ३२४ ठराव दाखललाचखोर निमतानदाराचा मुखवटा फाडला; शिरोळ भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यातकोल्हापूर महापालिकेतील 'या' नगरसेवकांचे पद धोक्यात; जातीचा दाखला अवैध ठरल्याने खळबळजनसुराजच्या मेळाव्याला नवीद मुश्रीफ यांची उपस्थितीगोकुळ निवडणुकीसाठी शाहू समविचारी आघाडी उद्या मंगळवारी ठराव दाखल करणारझांबिया-भारत शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा; झांबियाच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाची वारणा विद्यापीठाला सदिच्छा भेट३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईरेड झोन नियमावलीच्या बंधनात अडकलेले डी.पी. रोड पूर्ण करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची विधिमंडळात मागणीस्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसाद

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीसाठी शाहू समविचारी आघाडी उद्या मंगळवारी ठराव दाखल करणार

schedule29 Jun 26 person by visibility 269 categoryउद्योग

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू समविचारी आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून जिल्ह्यातील सभासद संस्था प्रतिनिधींच्या नावांचे ठराव उद्या मंगळवारी सकाळी १०.०० वाजता मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल करण्यात येणार आहेत. ठरावधारक धैर्यप्रसाद हॉल येथे एकत्र जमून सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालय येथे जाऊन ठराव देणार आहेत.

यावेळी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, शिवसेना उपनेते संजय पवार,शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, गणपतराव पाटील, गोपाळराव पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, अंजनाताई रेडेकर,अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील,बयाजी शेळके,राहुल देसाई,सत्यजित जाधव,पी डी धुंदरे,हिंदुराव चौगले,सदाशिव चरापले,जीवन पाटील,

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर,जिल्हा परिषदेचे गटनेते एकनाथ पाटील,राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील,गगनबावडा पंचायत समिती सभापती छाया देसाई यांच्यासह ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes