SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणारराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षीस रक्कमेत भरघोस वाढराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून; अर्थसंकल्प ६ मार्च रोजीआनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीमधील गैरव्यवहार : ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारलाचित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा : रणजित जाधव बी. ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांशी संवादडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलर्सचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्तकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजीचंबुखडी व पुईखडी येथील थकबाकीदार अपार्टमेंटचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडितमेन राजाराम मध्ये इ.12 वी च्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रासायनिक व कृषी-रसायन उद्योगांतील कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र

schedule10 Feb 26 person by visibility 119 categoryशैक्षणिक

वारणानगर :  तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथे करिअर डेव्हलपमेंट सेल व केमिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन  यांच्या संयुक्त विद्यमाने 'रोल ऑफ एआय इन  केमिकल अँड ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.

या व्याख्यानासाठी सिंजेंटा, पुणे येथील माननीय डॉ. माधव काशीद, हे तज्ञ म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही रासायनिक व कृषी-रसायन उद्योगांमध्ये डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया, स्वयंचलन आणि प्रक्रिया सुधारणा सक्षम करणारी एक महत्त्वाची तांत्रिक शक्ती म्हणून कशी उदयास येत आहे, यावर ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. कृषी-रसायन क्षेत्रात सुरक्षित व परिणामकारक सूत्रीकरणे, पीक संरक्षण धोरणे, अचूक वापर आणि पर्यावरणावरील  परिणाम कमी करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमतेचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष,  डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी,  एन. एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, तसेच वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी, प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

डॉ. संतोष काडापूरे व डॉ. एस. व्ही. लिंगराजू समन्वयक असून ह्या कार्यक्रमास रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. आय. पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes