SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणारराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षीस रक्कमेत भरघोस वाढराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून; अर्थसंकल्प ६ मार्च रोजीआनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीमधील गैरव्यवहार : ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारलाचित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा : रणजित जाधव बी. ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांशी संवादडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलर्सचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्तकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजीचंबुखडी व पुईखडी येथील थकबाकीदार अपार्टमेंटचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडितमेन राजाराम मध्ये इ.12 वी च्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत

जाहिरात

 

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलर्सचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्त

schedule10 Feb 26 person by visibility 96 categoryशैक्षणिक

  इचलकरंजी : डीकेटीईच्या ईटीसी विभागातील तृतीय वर्ष बी.टेक.चे विद्यार्थी मंथन डोणे व ओंकार कोरे यांनी तोशिबा सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लि. बेंगळुरू यांच्या वतीने आयोजित 'ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉन'मध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवत ७५० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक पटकावले.

  ग्रीडडीबी यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय आयओटी स्तरावरील हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये देशभरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. प्राथमिक फेरीत देशभरातून मोठ्या संख्येने संघ सहभागी झाले होते. तोशिबा व ग्रीडडीबीमधील वरिष्ठ तांत्रिक तज्ज्ञांनी केलेल्या काटेकोर मूल्यमापनानंतर २८ संघांची निवड पुढील फेरीसाठी करण्यात आली. अंतिम टप्प्यात केवळ ५ संघ पात्र ठरले असून, त्यामध्ये डीकेटीईच्या 'टीम व्हायटलवॉच'चा समावेश होतो. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत व्हायटलवॉच टीमने तृतीय क्रमांक मिळवत ७५० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक पटकावले.

  ग्रीडडीबी हे एक लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असून प्रामुख्याने कॉम्प्युटर सायन्स, प्रोग्रॅमिंग आणि तंत्रज्ञानावर केंद्रित शैक्षणिक सामग्री प्रदान करते. या हॅकॅथॉनमध्ये आयआयटीसह नामांकित संस्थांतील विद्यार्थी व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा थेट सहभाग असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च होती. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य आणि नावीन्यपूर्ण उपायांसह देशातील सहभागी झालेल्या टीम्समध्ये तृतीय स्थान पटकावले.

  या स्पर्धेसाठी त्यांच्यामार्फत देण्यात आलेल्या विषयावर विद्यार्थ्यांनी आधुनिक संकल्पनेद्वारे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देत समाजोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'व्हायटलवॉच' हा प्रकल्प मानवी शरीरातील रक्तदाब, रक्तातील साखर यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य घटकांचे सातत्याने निरीक्षण करणाऱ्या आयओटी-आधारित रिअल टाइम हेल्थ मॉनिटरिंग प्रणालीवर आधारित आहे. संभाव्य आरोग्यविषयक धोके वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या यशातून डीकेटीई इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध असलेले भक्कम तांत्रिक मार्गदर्शन, नवोपक्रमशील शैक्षणिक संस्कृती व उद्योगाभिमुख शिक्षण वातावरण अधोरेखित झाले आहे.

  डीकेटीई नेहमी अशा पद्धतीच्या हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देते. यामध्ये यशस्वी होण्यासाठी येथील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून विविध प्रकारच्या ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकलची तयारी करून घेतली जाते. अभ्यासाव्यतिरिक्त इंडस्ट्रीला लागणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्यामुळेच डीकेटीईचे विद्यार्थी देशभरात चमकतात.

  डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes