SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणारराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षीस रक्कमेत भरघोस वाढराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून; अर्थसंकल्प ६ मार्च रोजीआनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीमधील गैरव्यवहार : ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारलाचित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा : रणजित जाधव बी. ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांशी संवादडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलर्सचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्तकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजीचंबुखडी व पुईखडी येथील थकबाकीदार अपार्टमेंटचे पाणीपुरवठा कनेक्शन खंडितमेन राजाराम मध्ये इ.12 वी च्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी

schedule10 Feb 26 person by visibility 78 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सोमवार दि. 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

 जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा. शासन परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार अर्ज स्वीकारले जातील. तसेच सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंतच अर्ज स्विकारले जातील. दुपारी 1 नंतर कोणताही अर्ज स्विकारला जाणार नाही, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes