SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफलक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंतीकोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यशयुवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुकसहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

युवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुक

schedule23 Nov 26 person by visibility 273 categoryसामाजिक

कोल्हापूर  : येथील युवाशक्ती फाऊंडेशनच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गिरगाव येथील सैनिक हॉलमध्ये भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास कळंब्याचे माजी लोकनियुक्त सरपंच  सागर  भोगम यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात तरुणांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने आयोजित केलेल्या या मेळाव्यात टेक्स्टाईल, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग या प्रमुख क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ५०० नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परिसरातील शेकडो युवक-युवतींनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना  सागर  भोगम म्हणाले की, "युवक-युवतींना हक्काचे व्यासपीठ व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे असे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळाल्यास त्यांना नवी दिशा आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण होते."

या प्रसंगी संपत पाटील बापू, संभाजी पाटील, सर्जेराव पाटील, राकेश सर, दाजी चव्हाण, माणिक यमगर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes