SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोयनेचे वीजनिर्मितीनंतरचे पाणी मुंबईला नेण्यास हरकत नाही; मात्र वारणेचे पाणी देणार नाही : हसन मुश्रीफलक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंतीकोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यशयुवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुकसहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफ

schedule23 Nov 26 person by visibility 231 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हयात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गंत कागल,गडहिंग्लज व उत्तूर येथील तसेच हॅम योजनेतंर्गंत कागल तालुक्यात सुरू असलेली कामे येत्या जानेवारी अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालीच पाहिजेत असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

 कागल,उत्तुर तसेच गडहिंग्लज या गावांच्या रस्ते व इतर प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, एकनाथ काळबांडे, तहसीलदार अमरदीप वाकडे,कागल न.प.चे मुख्याधिकारी अजय पाटणकर, क्रांतीकुमार मिरजकर,युवराज पाटील,भैय्या माने आदी उपस्थित होते .

 मुश्रीफ पुढे म्हणाले ,कागल येथील रि .स नंबर 426 येथे राहणाऱ्या नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डबाबत प्रशासनाने योग्य तो समन्वय साधून मानवीय दृष्टिकोनातून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा.तत्पूर्वी रि .स नंबर 426 येथील 42 गुंठे धारकांना वगळून उर्वरित जागेचा वेगळा 7 / 12 उतारा करण्यात यावा.तसेच ही जमीन वर्ग एकची करण्यात यावी अशी मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी केली . यावर जिल्हा प्रशासनाने योग्य तो अभ्यास करून हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.यावेळी श्री मुश्रीफ यांनी, २०११पूर्वीचे शासकीय जागेवरील अतिक्रमीत बांधकाम नियमित करणे योजनेअंतर्गत ग्रामपंचायत सिध्दनेर्लीयेथील वाढीव गावठाण / गायरान लाभार्थी प्रस्ताव तसेच
गडहिंग्लज येथील नवीन क्रीडांगण अर्थात एम.आर. हायस्कुलच्या नवीन क्रीडांगणाची जागा ही जिल्हा परिषद अधिपत्याखालील असल्याने सदरची जागा जिल्हा परिषदच्या नावे होण्याबाबतही सविस्तर आढावा घेतला. या आढावा बैठकीसाठी उपअभियंता सी .ए पाटील, बी.ए पुजारी, एम.पी. पाटील यांच्यासह संबंधित कंत्राटदार तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes